करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी व शेतकऱ्याला तातडीची मदत करण्यासाठी शासनाने EKYC शिवाय पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफी ची रक्कम वर्ग करावी-किशोर मस्कले

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  क्यादरकुंटे 

जगामध्ये धुमाकूळ घातलेला करोना वायरस भारतात ही पाय पसरतो आहे.याच्याच उपाय योजना म्हणून केंद्र व राज्य सरकारने भारतात व महाराष्ट्रात 14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित केलेले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2 लाखापर्यंत ही दिलासा देणारी कर्जमाफी शासनाने घोषित केलेली आहे, सर्व बँका कडून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडे पोचल्या आहेत,काही जिल्ह्यात तिची ekyc प्रक्रिया पूर्ण होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परंतु काही जिल्ह्यात चालू असलेल्या ग्राम पंचायत निवडणूक आचारसंहिता चालू असल्यामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली होती. सद्याची 21 दिवस लॉकडाऊन व नंतर ही ekyc द्वारा करोना वायरस चा संसर्ग प्लास्टिक व काचेवर म्हणजेच बायोमेट्रिक मशिनवर जिवंत राहण्याची शक्यता ही 14 तासांपर्यंत आहे.पुन्हा ही आपले सरकार व सेतू सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी होऊन हा विषाणू पसरण्याचा धोका वाढू शकतो.

शेतकऱ्यांना आता सध्या आशा परिस्थितीत आर्थिक दिलाष्याची गरज आहे. ekyc मधून फक्त दोनच गोष्टी प्रामुख्याने चाळणी केली जाणार होती एक म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफी मान्य आहे का..? व दुसरे म्हणजे खरीच ती व्यक्ती आहे का..? प्रतेकच शेतकऱ्यांना कर्जमाफी ची गरज आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हा प्रश्न न विचारता व आजपर्यंत झालेल्या सर्वच कर्जमाफी ही बँकेनि दिलेल्या याद्या ग्राह्य धरूनच दिल्या गेल्या असल्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती व सर्व गोष्टीचा विचार करता पाहता सरकारला नम्र विनंती की ekyc न करता संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.