शासनाचा सुशिक्षित बेरोजगार नर्सेसच्या जिवाशी खेळ – ब्रदर आदी बनसोडे

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यामध्ये दरवर्षी लाखो नर्सेस उत्तीर्ण होतात, यामध्ये एएनएम,जिएनएम, बिएससी नर्सिंग असे लाखो रुपये खर्च करून शिक्षण घ्यावे लागते लगेच खाजगी हाॅस्पिटल मध्ये कामासाठी भन्नाट फिरुन ड्युटी जाॅईन करतात ते पण सात ते आठ हजार महिना काम करतात, २०१६ च्या कोर्ट नियमानुसार खाजगी नर्सेसला दवाखान्याच्या बेड वरुन म्हणजेच विस ते पंचवीस हजार पगार द्यावा असे कोर्ट म्हणतो तो नियम लागू करत नाहीत, आणि खाजगी हाॅस्पिटल मध्ये बोगस स्टाॅफ भरती करुन पाच हजार महिना काम देतात,मग रजिस्टर नर्सेस कुठे जायचं,लाखो रुपये तिन ते चार वर्ष शिक्षण घेऊन पाच हजारांवर महिना लाज वाटत आहे.

 

आता महत्वाचे म्हणजे कोरोणा व्हायरस आला आहे सर्व देशभरात भीतीचे वातावरण तयार झाले, शेजारच्या देशात आरोग्य सेवा देणारे डाॅक्टर, नर्सेस व इतर स्टाॅफ कोरोणाच्या रुग्णांचा उपचार करुन तेच मरण पावले आहेत, तरीही नर्सेस ड्युटी करत आहेत,

महाराष्ट्रात सरकारी दवाखाने असे आहेत की, तिन तेरा नऊ अठरा वाजलेली परिस्थिती आहे,तातडीच्या वेळी सोईसुविधा उपलब्ध नाहीत, तातडीचे इंजेक्शन नाहीत, डॉक्टर नर्सेस पण जास्तीचे नाहीत हे सरकारला माहिती आहे म्हणून कोरोणा व्हायरससाठी कंत्राठी पद भरती काढलेली आहे ते पण तिन महिन्यासाठीच आणि कोरोणा असे पर्यंत विस हजार पगार देणार, एवढा मोठा भयानक रोगाच्या विरुद्ध नर्सेस आपला जिव धोक्यात घालून तिथे ड्युटी करतात आणि त्यांना फक्त कंत्राठीवर,कामापुरते मामा,नंतर काॅन्ष्ट्राक्ट संपल्यावर वाऱ्यावर जगायचे का? अगोदरचे तुमचे जावई म्हणजे पर्मनंट साठ ते सत्तर हजार पगार वाले ते काय आराम साध्या जनरल वार्ड मध्ये ड्युटी करणार आणि कंत्राटी कोरोणा वार्ड मध्ये ड्युटी करायचं, पर्मनंट नर्सेसना कोरोणा वार्ड मध्ये ड्युटी लावावेत व कंत्राठी धारकांना इतर वार्ड मध्ये ड्युटी लावा, नाहीतर कंत्राठी ऐवजी पर्मनंट भरती करुन पगार वाढ द्यावा आणि आमच्या नर्सेसना मरणांच्या दारात सोडू नका?