बेटमोगरा येथे दत्ता पाटील बेटमोगरेकर यांच्या वतीने गरिबांना धान्य वाटप

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन  जगडमवार

कोरोना विषणुपासून बचाव करण्यासाठी जनतेनी घराबाहेर पडू नये म्हणून जनता कर्फुच्या माध्यमातून २१ दिवसाचे लॉकडाऊन चे आदेश देण्यात आले आहे पण  हातावरचे  पोट  असणाऱ्या  गरिबांना आमदार डॉ.तुषार राठोड यांच्या  सूचनेवरून  बेटमोगरा गावातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्तात्रय बालाजी पाटील बेटमोगरेकर यांनी  गोर गरिबांना  दि.२९ मार्च रोजी तांदूळ,गहू,गोडतेल पॉकेट असे जीवनावश्यक धान्यांचे वाटप केले.

‘कोरोना विषाणू’ संसर्गाने देश लॉकडाऊन झाला आहे.यामुळे देशातील अनेकजण आर्थिक संकटात सापडले आहेत.विशेषत: ज्यांचे पोट हातावर आहेत असा गरीब वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशा परिसथितीमध्ये ते लोक करावेत तरी व खावेत तर काय असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला होता  पण  या मदतीमुळे  त्यांना  आधार  मिळाला आहे .

यावेळी रामदास मुदळे,इमाम पिंजारी,विश्वनाथ शिंदे,उत्तम शिंदे,आदि सह महिला पुरुष उपस्थिती होते.