डोरनाळी ग्रामपंचायतीच्या वतीने कोरोना विषाणू, डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी निर्जंतुकिकरण फवारनी

नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड : संदीप पिल्लेवाड

मुखेड तालुक्यातील डोरनाळी ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष खबरदारी म्हणुन कोरोना विषाणू व डासांचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी गावामध्ये मुख्य रस्त्यासह विविध ठिकाणी जंतुनाशक अौषधींचा वापर असलेली फवारणी करण्यात आली

याकामी संरपंच, उपसंरपंच, ग्रा.प.सदस्य, ग्रामसेवक, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, आशावर्कर सह ग्रामपंचायतीचे सेवक परिश्रम घेत आहेत त्याचबरोबर गाव पातळीवरील समितीतील ग्रामसेवक, आरोग्यसेवक, आरोग्य विभागाचे कर्मचारी, पोलिसपाटील, अंगणवाडी सेविका, आशावर्कर, मदतनीस यांनी शहरातुन डोरनाळी येथे येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेवुन कोरोना विषाणू रोगा विषयी काही लक्षणे आहेत काय यासंदर्भात विचारपूस व तपासणी करुन त्यांच्या हातावर विलगीकरण शिक्का मारत आहेत तसेच गावामध्ये सर्वेक्षण करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

त्याचबरोबर नोंदी घेतलेल्या नागरिकांची यादी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पाठवुन आपली जबाबदारी पार पाडत आहेत तसेच याकामी कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी मुक्रामाबाद पोलिस ठाण्याच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे कोरोना विषाणू प्रतीबंध उपाययोजने संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसासाठी देशात लाॅकडाऊन जाहीर केले असुन याचे तंतोतंत पालन करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी घरच्या बाहेर निघु नये, आपली व आपल्या परिवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच सार्वजनिक ठिकाणी जास्त व्यक्ती एकत्रित थांबुन गर्दी करु नये, गर्दीच्या ठिकाणी जावु नये तसेच कोरोनापासुन वचाव करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहानही ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे