मुखेडात संचारबंदीत नागरीकांचा मुक्त संचार प्रशासनाने कठोर पाऊले उचलण्याची गरज

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

कोरोना प्रादुर्भाव इतरांना होऊ नये यासाठी सरकारने कलम 144 अंतर्गंत संचारबंदी लागु केली पण या संचारबंदीत मुखेड तालुक्यातील नागरीक मात्र मुक्त संचार करताना दिसत आहेत.

सोशल डिस्टंशन ठेवून नागरीकांना अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहेत मात्र अत्यावश्यक सेवेचे नाव समोर करुन अनेक रिकामटेकडे नागरीक, युवक बाहेर पडुन कायदयाची पायमल्ली करतानाचे चित्र सध्या मुखेडध्ये दिसत आहे.

मुख्य रस्त्यावर थोडा शुकशुकाट दिसत असला तरी शहरातील गल्लीबोळात मात्र टोळया जमल्यासारखे जमतात आणि सोशल डिस्टंशन न ठेवता सर्रास बात्या ठोखत बसतात यामुळे प्रशासन कुठेतरी कमी पडत आहे की काय ? असा सवाल अनेक सुज्ञ नागरीकांनी उपस्थित केला आहे.

तालुक्यातील आरोग्य सेवा पाहता अंदाजे 6 व्हेंटीलेटर असुन यातील 4 व्हेंटीलेटर हे खाजगी  दवाखाण्यात तर केवळ 2 व्हेंटीलेटर हे उपजिल्हा रुग्णालयात असल्याची माहिती आहे त्यामुळे नागरीकांनी सुध्दा याची काळजी घेऊन तीन लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या मुखेडकरांनी सामाजिक भान ठेवणे गरजेचे आहे.