सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने पोलीस प्रशासनातील व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क चे वाटप.

इतर बातम्या इतर लेख नांदेडच्या बातम्या

उदगीर : प्रतिनिधी:-

उदगीर येथील सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता आपल्यासाठी वर्षाचे बारा महिने जिवाची पर्वा न करता आपल्या सुरक्षेसाठी तत्पर असणारे पोलीस प्रशासनातील व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्याप्रती असलेली भावना व्यक्त करत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी लोकनेते सुधाकर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आज उपजिल्हा रुग्णालय, उपविभागीय पोलिस कार्यालय, शहर पोलीस स्टेशन येथे मास्कचे वाटप केले.

यावेळी डीवायएसपी जवळकर, डॉ.दत्ता पवार, डॉ.शशिकांत डांगे, पीआय शिरसाठ, एपीआय गायकवाड, पीएसआय घोडके, उपनगराध्यक्ष सुधीर भोसले, अभंग जाधव, मिलिंद घनपाटी, मयूर वटमवार, संदीप सोनवणे, सतीश पाटील मानकीकर व संयोजक बाळासाहेब पाटोदे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी घरी रहावे, असे आवाहन डॉ.दत्ता पवार यांनी केले तर कोरोना संकटाशी लढण्यासाठी कोणत्याही अडचणीत हाक मारावी असे आवाहन संयोजक तथा सह्याद्री प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांनी केले.