निराधार व श्रावणबाळ लाभार्थ्यांना तात्काळ मानधन वाटप करा – आ. डॉ. राठोड 

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  ज्ञानेश्वर डोईजड

    तालुक्यातील निराधार व श्रावणबाळ यांना मागील तीन महिण्यापासुन मानधन मिळाले नसुन त्यांना तात्काळ मानधन वाटप करावे अशी मागणी आ.डॉ. तुषार राठोड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

देशात संचारबंदी लागु असुन यामुळे अनेक निराधावर उपासमारीची वेळ आलेली आहे. कोरोनामुळे अनेकांच्या हाताला असलेले काम बंद झाले असुन निराधारांना आता केवळ या योजनेचाच आधार आहे त्यामुळे निराधार व श्रावणबाळ यांचे थकीत असलेले मानधन तात्काळ उपलब्ध करुन दयावे अशी मागणी सुध्दा या निवेदनातून करण्यात आली आहे.


 मागील तीन महिण्यापासुन मानधन न मिळाल्याने तालुक्यात निराधारांचा आधार गेला असुन आ.डॉ. राठोड यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ मानधन देण्यात यावे अशी मागणी सुध्दा लाभार्थ्याकडून होत आहे.