तेलंगणा राज्यात अडकले मजूर महाराष्ट्रात आना..

नांदेड नांदेड जिल्हा मुखेड

प्रतिनिधि : पवन जगडमवार

मुखेड तालुक्यातील हजारो मजूर तेलंगणा राज्यात अडकले असून त्यांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांची खूप मोठी गैरसोय होत असून, त्या नागरिकांना महाराष्ट्रात आणा अन्यथा सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

यामध्ये प्रमुख्याने बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून हे मजूर ऊस तोडणी करून पैसे कर्ज अंगावर असल्यामुळे मिरची तोडण्यासाठी तेलंगणा राज्यात तील खम्मम या जिल्ह्यात अनेक गावांमध्ये हजारो मजूर कामासाठी गेले असून या जगावर व या देशावर करोना महामारि या रोगाने थैमान घातले आहे.

 

यांचे खुप मोठा परिणाम सामान्य लोकांना बसणार असल्याने या देशातीचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदिजी व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यासह देशात अचानकपणें 144 धारा व संचारबंदी लावल्यामुळे मुळे तालुक्यातील हजारो मजदूर मजूर तेलंगणा राज्यामध्ये अडकले असून त्यांना अत्यावश्यक सुविधा मिळत नाहीत.

 

यामुळे अत्यावश्यक खदरी करण्यासाठी सर्व गावांमध्ये गावबंदी बंदीचे आदेश तेथील शासनाने दिलेले असून यामुळे मजूर वर्गाची जी खूप मोठ्या प्रमाणात होत गैरसोय होत असून ,त्यामुळे येथील नागरिकांना स्थानिक सरकारकडून सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या द्याव्यात अथवा महाराष्ट्र शासनाने ह्या नागरिकांना महाराष्ट्रात आणावे अशी मागणी आ.तुषार राठोड व ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने सुनील राठोड वसुरकर यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, पालकमंत्री व जिल्हाधिकारी नांदेड यांना दूरध्वनी व व्हाट्सअप द्वारे कळविले.