भटक्यांच्या पालावर प्रशासन व व्यापार्‍यांनी केली मदत

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र लोहा
लोहा : प्रतिनिधि
                पालावर उपाशी असणाऱ्या भटक्यांना मदतीसाठी काल डाॅ.  संजय बालाघाटे ,कृषी अधिकारी देवानंद सांगवे आणि बालाजी जाधव यांनी लोहा तहसीलदार परळीकर साहेब व पुरवठा अधिकारी बोरगावकर साहेबांची भेट घेतली
             आज दि 29 रोजी रोजी महसूल प्रशासनाने तातडीने नाथजोगी, मांगारूडी, पारधी, गिरीगोसावी, नंदीवाले पाथरवट, मसनजोगी 125 कुटुंबांना व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून ज्वारी व तांदळाचे वाटप करण्यात आले.
        यावेळी तहसीलदार परळीकर साहेब आधिकारी बोरगावकर साहेब,डाॅ. संजय बालाघाटे, देवानंद सांगवे, नामदेव कटकमवार, चंद्रकांत दमकोंडवार, बालाजी जाधव,  माधव ससाने, सरपंच भीमरा़व जोंधळे यांच्यासह राष्ट्रीय भटक्या-विमुक्त जमाती महासंघ महाराष्ट्र शाखा लोहा ते कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदार साहेबांनी भटक्यांना कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केले.