प्रभागात डोर टु डोर फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगर परिषदेच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावर द्रव्य स्वरुपात व रात्री धुराच्या स्वरुपात फवारणी करण्यात येत आहे पण प्रभागात, गल्लीत अद्याप फवारणी करण्यात आली नाही. प्रभागात डासांचे प्रमाण खुप वाढले आहे व कोरोणा विषाणु सक्रीय होऊ नये म्हणुन मुखेड शहरातील प्रत्येक प्रभागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हाॅटसअपच्या माध्यमातुन संचारबंदीचे नियम पाळत सोशल मिडीया व्दारे प्रभागात डोर टु डोर फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.

सध्या जगात कोरोणा (कोविड १९) विषाणुने थैमान घातले असुन भारतातही मोठ्या प्रमाणात कोरोणा विषाणुंची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याचीच खबरदारी म्हणुन शासनाने दि.२१ मार्च पासुन संचारबंदी पुर्ण देशात लागु केल्याने नागरिक सध्या घराच्या बाहेर पडत नाहीत.मुखेड शहरात अद्याप तरी कोणालाही कोरोणा विषाणुची लागण झालेली नाही. कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व शहरात कोरोना विषाणू सक्रिय होवू नये यासाठी फवारणी व स्वच्छता करण्याची खुप गरज आहे.

शहरातील प्रत्येक वार्डामध्ये मध्ये डासाचे प्रमाण वाढले असुन नालीपण स्वछ नाहित यापासून हिवताप व डेंगूचा प्रसार होण्याची दाट शक्यता आहे. तरी तात्काळ फवारणी व स्वच्छता करण्याची मागणी शहरातील तबेला गली मधुन व्यंकट गंदपवाड,संजय दुय्येवाड बेळीार,कोळी गल्ली सय्यद अब्दुल,मोमीन गली आसद बल्खी,दिप नगर सचिन मेनकुदळे,महाकाली गल्ली कैलास माधसवाड,प्रताप चौधरी,फुलेनगर, खंडोबा गल्ली,राजमाता अहील्याबाई होळकर नगर आदी ठिकाणाहुन वार्डातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांनी मुखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक यांच्याकडे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मागणी केली आहे.

 


शहरातील प्रत्येक वार्डात फवारणी केली जाईल –मुख्याधिकारी

मुखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दुरध्वनी वरुन संपर्क साधुन विचारपुस केली असता म्हणले की मुखेड शहर मोठे असुन सध्या मुख्य रस्त्यावर फवारणी करण्यात आली आहे व आता प्रभागात वार्डात फवारणी चालु केली आहे नागरिकांनी संयम बाळगावे शहरात सगळीकडे फवारणी करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी म्हणले आहेत.