मुखेडकरांचा मदतीचा ओघ सुरुच हातावरचे पोट असणार्‍या­ अनेक कुटूंबापर्यंत पोहचली मदत नगरसेवक प्रा. आडेपवार मित्र मंडळाच्या माध्यमातून चालु आहे कार्य

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

  कोरोनाशी घरी बसुन लढू पण पोटाचं काय  ? असा प्रश्न हातावरचे पोट असणार्‍याया अनेक नागरीकांचा त्यामुळे नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांनी अशा नागरीकांना मदत केली ही संकल्पना पाहुन अनेकांनी मदत केली त्यात ऐंशी  कुटूंबा पर्यंत मदत पोहचविण्यात आली. 

दि. 29 रोजी योगेश देबडवार यांच्या वतीने 2 क्विंटल गहु (पाच हजार रुपये ),प्रतापसिंह चौहाण यांच्याकडुन 10 कुटुंबास 10 किट,प्रकाश भांगे यांच्याकडुन 8 किट, जीवण कवटीकवार यांच्याकडून लागेल तेवढे पारले बिस्कीट पुढे, दिवाकर पायरे यांच्याकडुन 2 किट, गजानन उमाटे यांच्याकडुन 2 किट,मंगेश कोडगीरे यांच्याकडून एक किट,रामदास फस्कुलवाड यांच्याकडुन एक किट अशी मदत करण्यात आली. एक किट मध्ये गहु, तांदुळ, मिठपुडा, तेल, मिरची, हाळद,साबण,दाळ,साखर,पत्ती,जीरा,दाळवा,कपडयाची साबण,भांडी साबण, बिस्कीट  असे आठ ते दहा दिवस पुरेल असे साहित्य आहे.सोशल मिडीयातून मिळालेल्या या प्रतिसादाचा ओघ सुरुच असुन सोशल मिडीयाचा असाही गोर गरीबांना, हातावरचे पोट असणा­र्‍याना फायदा होऊ शकतो हेही तितकेच महत्वाचे. नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार मित्र मंडळाच्या वतीने अगोदर सुरु केलेली या संकल्पनेस वाढत्या पाठींब्यामुळे अनेक गरजु व्यक्तीपर्यंत अन्नधान्य जात आहे. हाताला काम नाही, सरकारचे धान्य येई पर्यंत लेकरांना काय खाऊ घालावे, चुलबंद असताना चुल चालू करण्याच्या या प्रयत्नामुळे अनेक दानशुर दाते समोर येत आहेत.


           या कामात नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्यासह हाफीजसाब सौदागर, मनोज कोडगीरे, संजय कोटगीरे, ज्ञानेश्वर डोईजड,पृथ्वीराजसिंह चौहाण,शंकर उमाटे,संदिप पोफळे, संजय वाघमारे, प्रमोद मदारीवाले,योगेश पाळेकर, शाम पोतदर, पप्पु चिंतमवाड, बालाजी नागलपल्ल्ले,धनंजय मुखेडकर, विनोद दंडलवाड, नागेश लोखंडे,संदिप पिल्लेवाड, शंकर चिंतमवाड, गजानन उमाटे,युसूफ शेख, मारोती घाटे, जगदीप गायकवाड यांच्यासह अनेक बांधव काम करीत आहेत.