कोरोना विषाणू प्रतीबंध उपाययोजनेसंदर्भात कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ५ कर्मचाऱ्यांवर कारणे दाखवा नोटीसा

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदिप पिल्लेवाड

कोरोना बाधीत रुग्नांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून पुणे,मुंबई, औरगांबाद, व इतर शहरात नौकरी व कामासाठी वास्तव्यास असलेल्या नागरीकांनी त्याठिकाणी कोरोना विषाणूने शिरकाव केल्याने त्याच्या धास्तीने तालुक्यातील नागरिक मोठया प्रमाणात गावाकडे येत आहेत.

 

त्यामुळे शहरात फोपावलेला कोरोना ग्रामीण भागात शिरकाव करेल या भितीने खबरदारी म्हणून बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांच्या नोंदी घेण्याकरिता व डोर टु डोर सर्वेक्षण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावपातळीवर कर्मचा-यांची समीती गठीत करण्यात आली अाहे पण काही गावातमध्ये कर्मचारी माहीती देण्यास हयगय केल्याने व दिरंगाई निदर्शनास येताच तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी ५ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोंटीसा बजावली आहेत यापुढे कर्मचाऱ्यांच्या कामात निष्काळजीपणा दिसून आल्यास साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवुन तात्काळ कारवाई करण्यात येईल असेही तहसिलदार पाटील यांनी सांगितले

मुखेड तालुक्यातील नागरीक हे शहरात नौकरी व रोजगारासाठी मोठ्या प्रमणात अाहेत पंरतु मागील काही दिवसापासून शहरी भागात कोरोना विषानुने हाहाकार माजवल्याने त्याची धास्ती घेत नागरीक गावाकडचा मार्ग धरत अाहेत तालुक्यात अाजपर्यंत बाधित शहरातुन येणाऱ्या नागरिकांची संख्या ६ हजार ५०० झाली असून यांना कोरोना विषाणू साथ रोगाची लागण झाली असावी का ? रोगा विषयी लक्षणे आहेत काय ही माहिती घेणे व सर्वेक्षण करण्यासाठी गावनिहाय समीती गठीत करण्यात अाली असून या समितीत गाव पातळीवर पर्येवेक्षक म्हणून ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी,कृृृषीसेवक किंवा शाळेचे मुख्याध्यापक यापैकी एका कर्मचाऱ्याची निवड करण्यात आली असून या समीती मध्ये सदस्य म्हणून प्राथमिक शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्यसेवक (पुरुष), आशावर्कर, पोलीस पाटील, कोतवाल यांची नियुक्ती केली आहे सरकार व प्रशासनाच्या वतीने या रोगावर प्रतिबंध करण्यासंदर्भात खबरदारी म्हणुन सर्वोंतोपरी प्रयत्न करीत अाहेत.

पण गावनिहाय समीतीत ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती त्यातील काही कर्मचारी वरिष्ठांचे अादेशाचे पायमली केल्याचे निदर्शनास येताच तहसीलदार काशिनाथ पाटील यांनी ५ कर्मचाऱ्यांना कामात कसूर केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोंटीस पाठवण्यात अाली आहे यात मौजे भुमीअभीलेख कार्यालयातील लिपीक एस.डी.राठोड, एस. पी. लाठकर, मंडळ अधिकारी जांब बु कु.एस.एन मुळजकर, गटशिक्षणधिकारी कार्यालयातील लिपीक दिनेश आपटे, पर्येवेक्षक तथा ग्रामसेवक एस.एस.बंडे या ५ कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावली आहेत यापुर्वी पाळा येथील पर्येवेक्षक.तथा कृषिसेवक एम. एन. आराध्ये व मौजे लखमापुर येथील पर्येवेक्षक कृषीसेवक एच. बी.राजमाने या दोन्ही पर्येवेक्षकावर नोटीस पाठवली होती आजतागायत एकुुन ७ कर्ममचाऱ्यांना नोटीसा बजावल्याने इतर कर्मचाऱ्यांत खळबळ उडाली असल्याचे चित्र दिसून येत आहे