“त्या” 6 दिवसाच्या बाळासाठी धावले खा. डॉ.जयशिध्देश्वर महास्वामीजी घेतली पूर्ण जबाबदारी: बाळाच्या मामाने केले होते ट्विट

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या मराठवाडा महाराष्ट्र

सोलापुर : वैजनाथ स्वामी

    सोलापुरच्या टिळक रोड येथील बागेवाडी हॉस्पिटलमध्ये सहा दिवसापुर्वीच प्रज्ञा शेंडगे रा.सोलापुर या माऊलीने एका गोंडस मुलास जन्म दिला. पाच दिवसानंतर काल अचानकपणे बाळाची तब्येत बिघडली. बागेवाडी दवाखान्यातील डॉक्टरांनी बाळास पुढील उपचारासाठी लहान मुलांच्या दवाखान्यात दाखल करावे लागेल असे सांगितले.

 

त्यामुळे लहान मुलांचे डॉ.उपासे हॉस्पिटल येथे काल बाळाला दाखल करून एनआयसीयु (काचेत) ठेवण्यात आले.बाळाच्या पुढील उपचारासाठी लागणारा खर्च पेलणे या कुटुंबाला सध्या शक्य नव्हते. बाळाच्या घरची परिस्थिती बिकट आहे.आर्थिक तडजोड करणे या टाळेबंदीत शक्य नाही.जगभरात कोरोना या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे सर्व प्रयत्न विफल झाले. मग आता करनार काय? सर्व दारे बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली.बाळाच्या मामाने गोविंद बोधे यांनी शक्कल लढवत ट्विटरवर सोशल मिडीयाचा उपयोग करत मुख्यमंत्री पर्यंत ट्विट करून सर्वांना आर्थिक मदतीसाठी अवाहन केले.

 

या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई येथिल डॉ.विजय जंगम (कार्याध्यक्ष-प्रवक्ता: अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ) यांनी ताबडतोब गोविंद यास संपर्क करून पुर्ण माहीती घेतली व स्वत: आर्थिक मदत करून खासदार डॉ.जयशिध्देश्वर महास्वामीजी यांना संपर्क केला.

 

सर्व प्रसंगाची माहीती घेतल्यावर खा.महास्वामीजी यांनी ताबडतोब आपल्या स्वियसहायकास मदतीसाठी डॉ.उपासे हॉस्पिटल येथे पाठवले व लागेल ते सहकार्य करा अशा सुचना दिल्या. तसेच फोनव्दारे डॉक्टरांशी संपर्क करून बाळाच्या तब्येतीची विचारपुस केली व बाळाच्या नातेवाईकास फोनवर संपर्क करत धीर देऊन गरज वाटल्यास मोठ्या हॉस्पिटल मध्ये एडमिट करून पुढील उपचार करू असे महास्वामीजी यांनी सांगितले.

आज पासुन उपचाराची संपुर्ण जबाबदारी आमची असे सांगत मदतीचा हात दिला.


हात तुझ्या मायेचा असुदे मस्तकावरी।
स्पर्श तुझा जिव्हाळ्याचा स्मरूनी जन्मांतरी।।