मुखेडच्या भुमिपुत्रांनी समोर केला मदतीचा हात   नगरसेवक प्रा.आडेपवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद

नांदेड नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड
   लॉकडाऊनमुळे हातावरचे पोट असणार्‍या गोर गरीबांना जगताही येईना अन मरताही येईना अशी परिस्थिती आहे. याचे भान ठेवून शहरातील नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या संकल्पनेतून अनेकांना मागील तीन दिवसापासुन मदत चालु आहे.

         पण मदतीच्या लाभार्थ्यांचा आकडा वाढत असल्याने मुखेडच्या भुमिपुत्रांना त्यांनी आवाहन केले या आवाहनास प्रतिसाद देत अशोक मडगुलवार पाच किट , माधव गोरे यांनी 10 पिठाच्या बॅगा व सतिष गुडमेवाड यांच्या वतीने एक क्वींटल तांदुळ, सुरेश उत्तरवार यांनी दोन किट, राहुल आडगुलवाड यांनी मिरची व हाळद, डॉ संदिप ढगे यांनी एक किट,नितिन कुणकीकर दोन किट, मंगेश कोडगीरे यांनी किट, अनिल चौधरी यांच्याकडून एक किट, धनंजय मुखेडकर दोन किट, विनोद दंडलवाड दोन किट असे दि. 28 रोजी देण्यात आले. मदत केंद्रास मुखेडचे तहसिलदार काशीनाथ पाटील यांनी भेट देऊन कामाचे कौतुक केले

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन झाले असले तरी कोरोनामुळे मरण येण्याअगोदर भुखेने मरण्याची परिस्थिती तालुक्यात आहे. अनेक गरीबांच्या घरी आज कामाला गेले तर उदया चुल घरी पेटते अशी विदारक परिस्थिती असल्याचे भान ठेवत नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांनी एक हजार रुपयांची किट तयार करुन त्यात सर्व किराणा साहित्य दिले. पण ही मदत कमी पडत असल्याने मुखेडच्या भुमिपुत्रांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाहन केले या आवाहनाला प्रतिसाद देत सामाजिक कार्यात रस असणा­रे नागरिक  स्वत: पुढे आलेले आहेत.


        रविवारी सुध्दा अनेकांनी मदत करण्याची ईच्छा व्यक्त केली असुन मदतीचा ओघ वाढत असल्याने प्रा.विनोद आडेपवार मित्र मंडळातील अनेक सदस्यात समाधानीचे वातावरण असुन वंचित, गोर गरीब, निराधार नागरीकांना मदत मिळत असल्याने या गरिबांच्या  चेहर्‍यावर आनंदाश्रू येत आहेत.