श्रीगणाचार्य मठ संस्थानच्या वतीने पोलिसांना भोजनाची सोय

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : पवन क्यादरकुंटे
        शहरातील श्रीगणाचार्य मठ संस्थानच्या वतीने मुखेड पोलिसांना भोजनाची सोय  करण्यात आली.
       कोरोनाचा प्रादुर्भाव नागरिकांना होऊ नये यासाठी दिवस रात्र कर्तव्य बजावणार्‍या पोलीस बांधवास  श्री गणाचार्य मठाची सामाजीक बांधीलकीची ,परंपरा जोपासत मठाधीपती डॉ.ष ब्र. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या वतीने भाजी, पोळी व पाणी बाटलीची सोय करण्यात आली.
           यावेळी मठाधीपती डॉ.ष ब्र. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्यासह मुखेड पोलिस निरीक्षक नरसिंग आकुसकर, पोउनि गणेश चित्ते, पोउनि भाऊसाहेब मगर,  पोउनि गजानन काळे,  पोउनि अनीता इटूबोने यासह मठाचे ओंकारअप्पा स्वामी, गंगाधर पाटील, अभय एकाळे, नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार, ज्ञानेश्वर डोईजड, विनोद दंडलवाड, धनंजय मुखेडकर, योगेश पाळेकर, प्रमोद मदारीवाले, संदीप पोफळे आदी उपस्थित होते.