“आम्ही तुमचा सांभाळ करु”, त्यांनी दिलेली मायेची हाक ऐकून दीडशे कुटुंब परतली माघारी

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र राष्ट्रीय

वैजनाथ स्वामी

देशभरातील मजूरांचा आपल्या गावाकडे लोंढा निघाल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत असतानाच वर्धा येथील दोघा ‘सचिन’ने पूढाकार घेत विनंती केल्यावर दीडशेवर परप्रांतीय गावातच थांबण्यास तयार झाले आहे. जय महाकाली संस्थेचे सचिन अग्निहोत्री व वैद्यकीय मंचचे डॉ. सचिन पावडे या दोघांनी केलेली विनवणी प्रशासनास दिलासा देणारी ठरली.
राजस्थान, मध्यप्रदेश व तेलंगणा येथील मजूर वर्ध्यात कार्यरत आहेत. मात्र रोजगार ठप्प पडल्याने ते परतीच्या प्रवासाला निघाले होते. प्रशासनाची विनंती त्यांनी धुडकावली. हे दीडशेवर कुटुंब रस्त्याने निघाले असतांनाच अग्निहोत्री व पावडे यांना या विषयाची माहिती मिळताच या कुटूंबाकडे धाव घेतली. रस्त्याने जाणे धोकादायक आहे. तुमच्या राज्याच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. वाटेत खाण्यापिण्याचे वांदे होतील. हे संकट झेलण्यापेक्षा तुम्ही कामाशिवाय राहाल तितके दिवस आम्ही सांभाळून घेऊ, अशी विनंती या दोघांनी केली. आम्हाला आपला मुलगाच समजा, अशी साद महिलांना घातल्यावर या कुटूंबांनी परत आपल्या झोपडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.
आर्वी नाका परिसरातील तेलंगणातील मजुरांना डॉ. पावडे यांनी पाच किलो तांदूळ व अन्य साहित्य देऊन अन्नपाण्याची व्यवस्था केली. तर सचिन अग्निहोत्री यांनी राजस्थानी व मध्य प्रदेशातील मजुरांकडे मोर्चा वळवला. प्रत्येक कुटूंबाला एका पोत्यात पाच किलो तांदूळ, पाच किलो गहू, तसेच कणीक, साखर, तेल, डाळ, जिरा पावडर, चणा, वटाणा, पोहे अशा विविध २१ वस्तूंचा ८२० रूपये किमतीचा शिधा दिला. ही मदत पाहून गहिवरलेल्या राजस्थानी महिला चक्क पाया पडायला लागल्या तेव्हा त्यांना धीर देण्यात आला.
स्वयंपाकाची चूल व भांडीकुंडी मजूरांकडे होतीच. यापुढील टप्यात वर्धेतील झोपडपट्टी वसाहतीत १०० कुटूंबांना उद्यापासून धान्य देण्याचे काम वैद्यकीय मंचातर्फे होणार असल्याचे डॉ. पावडे म्हणाले. तर गावातील भिकाऱ्यांना एका ठिकाणी जमा करून त्यांच्या थेट भोजणाची व्यवस्था करण्याचे ठरले असल्याचे अग्निहोत्री यांनी सांगितले. या प्रकरणी प्रशासनाने आमची मदत मागितलेली नव्हती. आम्हीच हे काम करण्यासाठी प्रशासनाला केवळ लेखी संमतीपत्र मागितल्याचे या दोघांनी सांगितले. आम्हाला याचा गवगवा नकोच, असेही ते प्रांजळपणे म्हणाले. उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांनी या कार्यामूळे प्रशासनावरील ताण कमी झाल्याचे मान्य केले. स्वयंस्फूर्तीने मदत करणाऱ्यांची यावेळी गरजच असल्याचे त्यांनी नमूद केले.
[16:35, 3/28/2020] Vaijnath SWami Nanded: शेतकर्याच्या एका मॅसेजला मुख्यमंत्र्याचे उत्तर; शेतकर्यांच्या भावना जपणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच
_____________

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सध्या राज्यात संचारबंदी लागू असल्याने ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक रोखण्यात येत आहे. अशाच नाकाबंदीत पोलिसांनी हिंगोलीतील एका शेतकऱ्याचा ट्रक अडवला. ट्रकमधून हा शेतकरी शेतातील संत्री घेऊन चालला होता. पोलिसांनी ट्रक अडवल्याने शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मेसेज केला आणि मदत मागितली. यानंतर जे काही घडलं त्यावरुन उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं जात आहे.
औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकरी बाळू पाटील यांची संत्रीची फळबाग आहे. बाळू पाटील हे जवळाबाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. बाळू पाटील यांना आपल्या शेतातील नऊ टन संत्री बंगळुरुला पाठवायचा होता. परंतू कोरोनामुळे जिल्ह्यांच्या सीमा सील असल्याने ट्रक अडवण्यात आला. पोलिसांच्या भीतीपोटी चालकानेही पळ काढला. यानंतर बाळू पाटील यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच मेसेज केला आणि घडल्या प्रकाराची माहिती दिली.
महत्त्वाचं म्हणजे करोनामुळे सध्या व्यस्त असणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी तात्काळ या मेसेजची दखल घेतली. त्यांनी लगेच परभणीचे पोलिस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांना फोन केला आणि शेतकऱ्यांची अडवणूक करुन नका असं सांगत ट्रक सोडण्याचा आदेश दिला. यानंतर बाळू पाटील यांचा ट्रक बंगळुरुच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आला.
बाळू पाटील हे शिवसैनिक आहेत. पण त्यांनी आपल्या मेसेजमध्ये कुठेही आपण शिवसैनिक असल्याचा उल्लेख केला नव्हता. तरीही उद्धव ठाकरे यांनी तात्काल मदत केली याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या रुपाने आपल्याला देव भेटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.