मुदखेड येथे किराणा,भाज्यांची चढ्या दराने विक्री…सोशल डिस्टंन्स संदेश फक्त नावाला,नियमांची पायमल्ली

ठळक घडामोडी नांदेडच्या बातम्या मराठवाडा मुदखेड

मुदखेड : रुखमाजी शिंदे

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात सर्वत्र संचारबंदी करण्यात आली आहे,तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून येत आहेत,शहरात किराणा,भाजीपाला,अाैषधी यांची दुकाणे उघडी ठेवण्यात आली असली तरीही या संधीचा फायदा घेत किराणा आणि भाजीपाल्यांची चढ्या दराने विक्री करण्यात येत.

असल्याने ग्राहकांची लुट होत आहे.प्रशासनाने सोशल डिस्टन्सिंग प्रात्यक्षिक करुन स्थानिक किराणा व्यापाऱ्यांना नियम घालून दिले असले तरीही त्या नियमांचे सर्रास उल्लघंन होतांना दिसून येत अाहे.

सोशल डिस्टन्सिंग संदर्भात उपविभागीय अधिकारी पवन चांडक,तहसीलदार दिनेश झांपले,नगरपरिषद मुख्याधिकारी रामराजे कापरे,सपोनि विश्वांभर पल्लेवाड,वैद्यकीय अधिक्षक डॅा.कपिल जाधव यांनी व्यापारी आणि नागरिकांना प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले आहे,येथील किराणा,भाजीपाला,आैषधी दुकानदारांना सोशल डिस्टंन्स विषयी माहिती दिली.

 

नियमाची पायमल्ली झाल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल असे बजावण्यात आले,परंतु पोलिसांची गाडी समोर असे पर्यत सोशल डिस्टन्सिंग नियम पाळला जात असून गाडी बाजूला गेली की किराणा,भाजीपाला दुकानावर गर्दी होत आहे.यामुळे कोरोना विषाणु संसर्ग संदर्भात नागरिक अजूनही दुर्लक्षपणा तसेच डोळेझाक पणा करत आहेत, या बंद मध्ये नागरिकांना जीवन आवश्यक बाबी मिळाव्यात या उद्देशाने शासनाने किराणा,भाजीपाला,आैषधी व्यावसायिकांना मोकळीक देण्यात आली आहे,परंतु बंदचा गैरफायदा घेत व्यावसायिकांनी अापला मनमानी कारभार सुरु केला आहे, शेंगदाणे ९० रुपये किलो असताना १३० रुपये तर डाळ ७० रुपये किलो असताना १०० रुपये,साखर ३५ रुपये असताना ४० रुपये,तांदूळ ४५ रुपये तर ६५ रुपये,खाद्यतेल ९० रूपये किलो परंतु तेल विक्री १२५ रुपये, टमाटे ५ ते १० रुपये किलो असताना ३० रुपये, लसून १५० रु किलो असताना २०० रुपये,पालक जुडी ०५ रूपये असताना १५ रुपये अशी चढ्या दरांने विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे,

 

अशा पद्धतीने काळाबाजार व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जन सामान्य नागरिकांची आहे. विशेषतः म्हणजे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे वैद्यकीय अधिक्षक डॅा.कपिल जाधव यांनी मोठ्या उमेदीने बाजारपेठत प्रात्यक्षिक केले,त्याच भागात दुकानावर झुंबड करताना दिसून येत आहे.ग्राहकांनी एकाच दुकानात गर्दी केल्यामुळे सोशल डिस्टन्स चा बोजवारा उडाला आहे.पोलिस आणि स्थानिक प्रशासन यांनी घालून दिलेले नियम पाळत नसल्यामुळे प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे मुदखेड तालुक्यातील नागरिकांचे लक्ष्य लागले आहे.