बारड पोलिसांनी वापरलेल्या ‘ या ‘ युक्तीने अनेकांच्या शरमेने झुकल्या, ‘ माना खाली!!

Uncategorized

मुदखेड : रुखमाजी शिंदे

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये,असे आवाहन केंद्र,राज्य सरकार, प्रशासन,पोलीस यांच्या वतीने वारंवार करूनही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसून येत होते,यामुळे बारड पोलिसांनी गांधीगीरी पध्दतीचा अवलंब करत फिरणाऱ्यांच्या कपाळी कुंकू लावून पुष्प देण्याचा फंडा आमंलात आणला आहे.

 

जिल्हा पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांची अगोदर विचारपूस करावी नंतरच प्रसादाचा मार्ग अवलंब करावा असा कडक सुचना पोलिसांना दिल्या होत्या,पोलिसांसोबत अत्यावश्यक सेवा बजावणारे काही नागरिक रस्त्यावरून प्रवास करत आहेत,असे त्यांनी सांगितले होते.यानंतर बारड पोलिसांनी बदल करुन गांधीगीरी मार्गाचा अवलंब केला.शुक्रवार आणि शणिवारी पोलिसांनी प्रत्येक वाहनचालकांच्या कपाळावर कुंकू लावून पुच्छ देऊन नमस्कार केला आणि विनंती करीत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.लाठीचार्ज न करता पोलिसांनी वापरलेल्या गांधीगिरीच्या कृतीचा परिणाम असा झाला की बाहेर पडलेल्या त्या व्यक्तींच्या माना शरमेने खाली झुकलेल्या दिसून आल्या.

शुक्रवार आणि शणिवारी दुपारी तीन नंतर रस्त्यावर कोणतंही वाहन घेऊन जाता येणार नसल्याचेही आदेश पोलीस अधिक्षक मगर यांनी दिलेले आहेत.दुपार नंतर तालुक्यातील बारड,निवघा,डोंगरगाव,पांढरवाडी,पाथरड,पार्डी,पाटनूर या गावांना पोलिसांनी भेट देऊन विनाकारण घरा बाहेर फिरू नका,अन्यथा कुंकू लावून स्वागत करण्यात येईल असे सांगितले, नागरिकांनी घराबाहेर पडू नये,असे आवाहन बारड पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे यांनी केले आहे.