कोराना गरीबांच्या मुळावर उठली सरकार कडून बेदभाव -पत्रकार पवन जगडमवार

Uncategorized नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड :  पवन जगडमवार

देश लॉकडाऊन हे यौग्यच पण देशात असलेल्या असंख्य गोरगरीब ,कष्टकरी ,शेतमजूर , भूमीहीन ,असंगटीत कामगार, बेघर,ऑटोरिक्षा – टॅक्सीचालक, निराधार नागरिक आहेत. त्यांचे हातावरचे पोट आहे काम केले तरच घरात चुल पेटते अन्यथा उपाशी राहवे लागते, अशा नागरिकांना २१ दिवसाच्या लॉकडाऊन मुळे मोठे संकट उभे राहिले आहे,

 

त्यामुळे या लॉकडाऊन च्या दिवसात हातावरचे पोट असलेल्या नागरिकांना लागणारे अत्यावश्यक असलेले सर्व साहित्य व राशन घरपोच व मोफत उपलब्ध करून दिली पाहिजेत यासाठी सरकारने तात्काळ उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून द्यावे व त्याचबरोबर देशात लॉकडाऊन जाहीर झाल्याने वाहतुकीची सर्व साधन बंद झालेली आहेत.

 

सर्व साधनं बंद झाल्याने निर्माण क्षेत्रातील कामगार , बांधकाम कामगार, असंघटीत क्षेत्रात काम करणारे कामगार, हातावर पोट असणारे गरीब, दररोज काम करून पोट भरणारे मजूर हे सर्व शहरात अडकले आहेत. त्यांना काम भेटत नाही, काम न भेटल्याने दोन वेळचं जेवण मिळणेही मुश्कील झाले आहे. या सर्व कारणांमुळे हे मजूर आपल्या गावाकडची वाट धरत आहेत.

 

वाहतुकीची काहीच साधन नसल्याने ते पायीच आपल्या गावी निघाले आहेत. यात कोणी 1200 पेक्षा जास्त किलोमीटर चालत आहे,तर कोणी 700 ते 800, तर कोणी 400 ते 500 किलोमिटर पायी चालून गावी जात आहेत.पण सरकार याकडे लक्ष देण्यास तयार नाही मात्र सरकार परदेशातील भारतीय नागरिकांना विशेष विमानं पाठवून देशात आणले जाते आहे, त्यांना आणलं गेलंच पाहिजे, याबद्दल काहीही मतभेद नाही.

 

जेवढे महत्वाचे हे परदेशी नागरिक आहेत, तेवढेच महत्वाचे कष्टकरी कामगार आहेत. त्यांचही जाण्याचं, किंवा राहण्याचं, जेवण्याचं नियोजन सरकारने करायला हवे होते. ते काहीही केलेलं नाही. म्हणूनच कामगारांना शेकडो – हजारो किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.


यातून सरकारचा भेदभाव स्पष्टपणे समोर येतो. एकासाठी विशेष विमान सुविधा, दुसऱ्यासाठी काहीही नाही.त्यामुळे सरकारकडे माझी अशी विनंती आहे जे गोरगरीब, कष्टकरी, कामगार, श्रमिक लोक रस्त्याने आपले मुलेबाळे घेऊन हजारो किलोमिटर पायपीट करून गावाकडे जात आहेत त्यांन त्यांच्या गावापर्यंत पोहचवण्याची वेवस्था सरकारने करावी अशी अपेक्षा पत्रकार पवन जगडमवार यांनी केले आहे