मुखेड उपजिल्हा रुग्णालयात २००० नागरिकाची तपासणी वैद्यकीय अधिकारी डाॅ. शेठवाड यांची माहिती

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : संदीप पिल्लेवाड

शहरात मुंबई, पुणे व ईतर महानगरातुन आलेल्या तब्बल २००० नागरिकांची दि. २० मार्च पासुन मुखेड उपजिल्हा रुग्णालयात तपासणी करण्यात आली आहे. व त्यांच्या हातावर होम क्वारेंटाईनचा (विलगीकरण) शिक्का मारुन त्यांना १४ दिवस घरी बसुन रहावे असे सल्ला वैद्यकीय कर्मचा-यांकडुन देण्यात येत आहे.

तसेच मुखेड तालुका हा डोंगराळ भाग असुन येथील हजारो नागरिक कामासाठी मोठ्या शहरात गेले आहेत. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने तेथील नागरिक आप आपल्या गावाकडे पलायन करत आहेत. दि. २० मार्च पासुन महानगरातुन येणा-या एकुण ६ हजार ५०० नागरिकांची तपासणी करण्यात आली असुन त्यांना घरी बसण्यासाठी सुचना करण्यात येत आहे. सुचनेचे पालन न केल्यास हाॅस्पिटल क्वारेंटाईन व पोलीस कार्यवाही करण्यात येईल व आय.टी.आय येथे ५० बेडचे आयसोलेशन वार्ड, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे २० बेडचे आयसोलेशन वार्ड, पाच प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रत्येकी ५ बेडचे आयसोलेशन वार्ड करण्यात आले आहेत अशी माहीती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले यांनी दिली.

आतापर्यंत बाहेरुन आलेल्या नागरिकांमधुन एकालाही कोरोणा विषाणुची लागण झाल्याचे आढळुण न आल्याने तालुक्यातील नागरिकांत समाधान वाटत आहे.

यासाठी तहसिलदार काशिनाथ पाटील, गट विकास अधिकारी कैलास बळवंत, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. रमेश गवाले, नियंत्रण कक्ष अधिकारी शिवाजी शितोळे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. विठ्ठल शेठवाड, औषध निर्माता फुले विजय, परिचारिका कीरण पवार, काॅउन्सलर शंकर सोमठाणकर आदीसह कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महसुल,आरोग्य विभाग,पंचायत समिती, नगर परिषद व कृषी विभागाचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत.


              उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा तुटवडा सध्या रुग्णालयात खोकल्याच्या औषधांचा तुटवडा असुन सॅनिटायझर व मास्क यांचा सुध्दा तुटवडा आहे व याची मागणी वरिष्ठाकडे केली आहे असे संबधित विभागाचे प्रमुख अन्सापुरे यांनी माहीती दिली आहे.