कोरोना  मुक्त करण्यासाठी लोह्यातील माझ्या तमाम जनतेनी मोलाची साथ देऊन कोरोना मुक्त संकल्प करूया — नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी

नांदेड जिल्हा लोहा

लोहा :इमाम लदाफ

लोहा शहरातील माझ्या तमाम नागरिकांना विश्वास देतो की  कोरोनाला हरवण्यासाठी लोहा शहरवासीयांची साथ मोलाची माझे शहर माझा देश पूर्णपने कोरोना मुक्त  करण्यासाठी संकल्प करूया असे आवाहन लोहा नगर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले आहे.

सद्या संपूर्ण जगात महामारी म्हणून भेडसावत असलेल्या कोरोना रोगाने आपल्या भारत देशात व राज्यात शिरकाव केला असून या महामारी कोरोना विषाणूला नष्ट करण्यासाठी त्याचा फैलाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्च रोजी संपूर्ण देशभर जनता  कर्फ्यू पाळण्याची आदेश दिले होते.

 

त्याला संपूर्ण देशवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला  आपल्या लोहा  शहरातील जनतेने ,व्यापाऱ्यांनी सर्वांनी जनता कफ्युचे 100% पालन केले तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिनांक 23 मार्च पासून लाॅकडाऊन राज्यात संचारबंदी  144 लागू केली . त्यालाही लोहा शहरातील जनतेने मोठा प्रतिसाद दिला .

 

दिनांक 24 मार्च रोजी रात्री आठ वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करून कोरोना रोखण्यासाठी देशाला संबोधित केले की दिनांक 24 मार्च  पासून रात्री 12 वाजल्यापासून दिनांक 14 एप्रिल 2020 पर्यंत संपूर्ण देशामध्ये 21 दिवस लॉक डाऊन करण्याचे आदेश दिले आहेत त्यांचेही जनतेने पालन करावे लोहा नगरपरिषद शहरवासीयांच्या सेवेसाठी सदा तत्पर असून शहरात संपूर्ण साफ-सफाई स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे कोरोना ला प्रतिबंध करण्यासाठी नगरपालिका चे उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम व सर्व सन्माननीय सदस्य मुख्याधिकारी डॉ .किरण सुकलवाड ओ एस उल्हास राठोड चांगल्याप्रकारे  परिस्थिती हाताळत आहेत लोहा नगरपरिषद कार्यालय व संपूर्ण लोहा शहरात फवारणी सुरू केली आहे .लोहा शहरातील आठवडी बाजार  याअगोदरच 31 मार्च पर्यंत नगरपालिकेने बंद ठेवला आहे .

 

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार 14 एप्रिल 2020 पर्यंत  आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे मुंबई, पुणे शहरातील आलेल्या नागरिकांची नगरपालिका यांच्या वतीने खबरदारी म्हणून चौकशी करून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात येत आहे बाहेरून आलेल्या नागरिकांची आम्ही खबरदारी घेत आहोत लोहा शहरात नागरिकांना कोरोना विषयी माहिती कळावी यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे लाऊडस्पीकर द्वारे जाहिरात करण्यात येत आहे. अनेक बॅनर ,पोस्टर द्वारे कोरोना रोखण्याचे उपाय योजना  सांगण्यात येत आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये गर्दी करू नये स्वच्छता  राखावी   खोकलताना, शिंकताना तोंडावर रुमाल धरावा हस्तांदोलन करू नये मांस व अंडी पूर्णपणे शिजवलेले खावे, अर्धवट शिजवलेले मांस मटण अंडी खाऊ नये संचारबंदी लागु झाली असल्या मुळे रस्त्यावर विनाकारण फिरू नये अत्यावश्यक सेवा असणाऱ्या दवाखाने मेडिकल व किराणा दुकान फक्त चालू राहतील या ठिकाणी गर्दी करू नका शासनाने केलेल्या सूचना आदेशाचे पालन सर्वांनी करावे कोरोना टाळण्यासाठी खबरदारी हाच उपाय आहे.

 

शहरातील सुज्ञ जनता माय बाप हे लोहा नगरपालिका ला वेळोवेळी सहकार्य करत आहेत प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक संदर्भात प्रधान सचिव आरोग्य विभाग मुंबई यांचे पत्र क्रमांक कोरोना क्रमांक प्रथम क्रमांक 58 आरोग्य 5 दिनांक  14 मार्च 2020 साथरोग प्रतिबंध हा सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडील अधिसूचना क्रमांक 2020 व जिल्हाधिकारी नांदेड यांचे पत्र क्रमांक 2020 नुसार कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत तसेच कोरोना विषाणूचा भीतीमुळे मूळचे लोहा शहरातील परंतु मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर अमरावती यवतमाळ या ठिकाणी कामाला असणारे नागरिक लोहा शहरात परत येत आहेत अशा नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे नाकारता येत नाही .

 

यामुळे अशा नागरिकांपैकी ज्यांना सर्दी ताप खोकला झाला आहे अशा  प्रकारचे  कोरोनाविषाणूची लागण झाल्याचे दिसून येत असेल त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे तपासणी करून घेणे बाबत कळवावे जे नागरिक कोरोना बाधित क्षेत्रातून आले परंतु आजारीची लक्षणे दिसून येत नाहीत त्यांनी पुढील 14 दिवस स्वतःच्या घरातच  वेगळ्या खोलीत रहावे लोकांपासून दूर राहण्याबाबत कळविण्यात यावे दरम्यान आजाराची लक्षणे दिसून असल्यास ग्रामीण रुग्णालय येथे उपचार घेतल्याबाबत कळवन्यात यावे तसेच खबरदारी म्हणून बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी लोहा नगरपरिषद कर्मचारी यांना पुढील प्रमाणे नेमनुका केल्या आहेत बाबाराव चव्हाण  ,वैजनाथ शेट्टे ,चांदु राजकौर, राजेंद्र सरोदे ,वार्ड क्रमांक 1 ते 13 चा भाग सायाळ रोड राजाराम नगर मुक्ताईनगर बळीराजा मार्केट, बळीराम पवार माधव पवार ,सोमनाथ केंद्रे वच्‍छलाबाई गव्हाणे ,वार्ड क्रमांक 2 ,12 ,13 ,14 व15 कलाल पेठ चव्हाण गल्ली, पवार गल्ली ,भोई गल्ली संपूर्ण जुना लोहा शहर, शेषराव भिसे, नंदकिशोर अंकले, वार्ड क्रमांक 9 व 13 पोस्टा मागील परीसर ,शिवकल्याण नगर ढोरवाडा ,साई गोल्डन सिटी, उल्हास राठोड ,शंकर वाघमारे, बालाजी कदम ,वार्ड क्रमांक चार, पाच, सहा ,व 17 आंबेडकर नगर बालाजी मंदिर परिसर ,बळीराजा मार्केट ,इंदिरानग,र पोलिस स्टेशन भाग जावई नगर ,बेनाळ  देवनेवाडी, व ता़डे असून लोहा शहरातील नागरिकांनी नगरपालिकेला सहकार्य करावेअसे आव्हान नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांनी केले आहे.

 


 लोहा शहरात आपल्याकडे बाहेर गावातून आलेले 151 जनाची ग्रामीण रुग्णालयात तपासणी करून त्यांना पंधरा दिवस बाहेर येऊ नये असे सक्त आदेश देण्यात आले जर ते बाहेर फिरत असतील तर त्यांच्यावर कढक कारवाई करून त्यांना बंदिस्त करण्यात येईल व कोणीही विनाकारण रस्त्यावर येऊ नये प्रशासनाला सहकार्य करावे अशी माहिती लोहा नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर किरण सुकुलवाड यांनी माहिती दिली