आंबुलगा येथे निर्जंतुकीकरण फवारणी कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी खबरदारी

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

कोरोना विषाणूंचा प्रार्दुभाव अन्य नागरिकांना होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊन घोषित केले त्यामुळे मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा येथील ग्रामपंचायतीने आज दि २७ मार्च रोजी सकाळी ९ वाजता गावातील सार्वजनिक ठिकाणी, मुख्य बाजार पेठेत, गावातील नाल्यावर आज निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली कोरोना विषाणूंचा प्रार्दभाव गावातील नागरिकांना होऊ नये यासाठी विषेश खबरदारी ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात येत आहे दर सोमवारी गावात भरणारा आठवडी बाजार बंद करण्यात आले, अत्यावश्यक असलेले मेडीकल व एक ते दोन किराणा दुकान, हॉस्पिटल,हे चालू ठेवून गावातील सर्व दुकाने बंद ठेवण्यास सांगण्यात आले, गावातील नागरिकांनी घराच्या बाहेर निघू नये सार्वजनिक ठिकाणी एकत्र येऊन बसू नयेत पुणे मुंबई औरंगाबाद हैदराबाद येथुन आलेल्या नागरिकांनची यादी करण्यात आली ती यादी प्रशासकीय यंत्रणेकडे सोपवण्यात आले आहे.

उपसरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील मोजक्या लोकांनी मिळून शहरातून आलेल्या नागरिकांना राजूरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीसाठी पाठवून दिले ज्या व्यक्तिच्या हातावर विलगीकरणाचा शिक्का मारला गेला आहे अशा व्यक्तीना व त्यांच्या कुटुंबाना भेट देऊन घराच्या बाहेर निघू नये अशी सूचना देण्यात आले, त्याच्यावर विषेश लक्ष ठेवण्यात येत आहे, कुणी आजरी पडल्यास त्यांना तात्काळ रुग्णालयात पाठवण्याची सोय करण्यात येईल ग्रामपंचायत सर्तक आहे, गावकर्यांनी सहकार्य करावे स्वतः ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावेत, अन्यथा कोणीही घराच्या बाहेर निघू नये यासाठी गावात दंवडी देऊन वारंवार सुचना देण्यात येत असल्याचे उपसरपंच विनोद गोविंदवार यांनी सांगितले.

मुक्रमाबाद येथील पोलीस स्टेशन ची पोलीस व्हँन पोलीस कर्मचारी परिसरात व गावात फिरुन नागरिकांना सुचना देत आहेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणार्या नागरिकांना चांगले चोप देण्यात येत आहे

 


सर्व गावकरी बांधव, लहान-थोर – तरुण मंडळीला विनंती आहे, की कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर तसेच गावाबाहेर पडू नये. पुणे-मुंबई-हैद्राबाद -चेन्नई आदी ठिकाणाहून आलेल्यांनी तर विशेष काळजी घ्यावी आणि घराबाहेर व गावाबाहेर पडू नये. जेणेकरून कोरोना रोगाचा संसर्ग आटोक्यात आणता येईल. काहीही अडचण आल्यास ग्रामपंचायतीस संपर्क करावे आपल्या सर्व प्रकारच्या अडचणी सोडवण्यासाठी ग्रामपंचयात 24 तास आपल्या सेवेत राहील. केंद्र व राज्यशासनाने जाहीर केलेली आर्थिक मदत आपल्यापर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही शक्य तेवढे सर्व प्रयत्न करू. आपण फक्त घरातच राहा, साबण व पाण्याने वारंवार हात स्वच्छ धुवून घ्या, भाजीपाला स्वच्छ धुवून वापरा, गरज पडलीच तर किमान दोन मिटर अंतर ठेवून बोला, शिंकताना खोकलताना तोंडावर रुमाल वापर आपल्या सर्दी -कोरडा खोकला – ताप असल्यास आमच्याशी तात्काळ संपर्क करा. शिस्तीचे पालन करून स्वतःचे, कुटुंबियांचे, अबाल-वृद्धांचे आणि गावाचे संरक्षण करा. – उपसरपंच विनोद गोविंदवार ग्रामपंचायत कार्यालय आंबुलगा (बु)