वाराणसीत अडकलेल्या नांदेडच्या 35 भाविकांची वैजनाथ स्वामी यांनी थेट जगद्गुरू 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना संपर्क करून जंगमवाडी मठात व्यवस्था करण्याची केली विनंती

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मराठवाडा

नांदेड : प्रतिनिधी

वाराणसीत लॉकडाऊन झालेले नांदेडच्या 35 भावीकांसाठी वैजनाथ स्वामी यांनी थेट जगद्गुरू 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांना संपर्क करून जंगमवाडी मठात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केली विणंती.

जगात सर्वत्र कोरोना या संकटामुळे अनेकजन विविध देेशात राज्यात शहरात लॉकडाऊन झाले आहेत.काही दिवसा पुर्वीच ऊझबेकिस्थान ताशकंद या देशातुन 40 महाराष्ट्रातील डॉक्टर लोकासहीत भारतातील एकुन 114 लोकांना मायदेशी परत घेऊन येण्यासाठी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघे राष्ट्रिय सचिव प्रवक्ता व लोकभारत न्युजचे सहसंपादक वैजनाथ स्वामी यांनी शर्थीचे प्रयत्न करून यश मिळविले.तसेच इराण येखिल अडकलेल्या 5 भारतीय लोकांची परत घेऊन येण्याची व्यवस्था देखिल केली आहे.

 

यातच आज सकाळी एका दैनिक पेपरवर बातमी वाचली की वाराणसी येथे नांदेडचे 35 लोक अडकले आहेत त्यांना जेवनाची व राहण्याची व्यवस्था नाही.हे वाचुन वैजनाथ स्वामी यांनी थेट जंगमवाडी मठ वाराणसी येथे संपर्क केला पुर्ण आढावा घेतला व नंतर जगद्गुरू १००८ डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचेशी संपर्क करून विणंती केली या सर्वांची योग्य ती व्यवस्था करावी.डॉ.चंद्रशेखर महास्वामीजी यांनी सांगितले की नांदेडच्या भाविकासहीत देशभरातुन अनेक लोक सध्या काशी येथिल जंगमवाडी मठात आश्रयाला आहेत.या ठिकानी या सर्व भावीक लोकांची पुर्ण देखरेख राहण्याची जेवनाची नाष्टा चहा या सर्व सुविधा पुरविल्या जात आहेत.

 

कोणत्याही प्रकारची गैर सोय होत नसुन मठात आलेल्या भाविकासहीत मठाबाहेरील किमान 100 गरजू लोकांच्या जेवनाची किट आम्ही पुरवित आहोत काळजी नसावी आम्ही पुर्णपने काळजी घेत आहोत.कोरोना व्हायर या पासुन बचाव करण्यासाठी मठातर्फे मास्क,सॅनाटाईजर,डेटॉल,साबन हँड ग्लॉज या सारख्या सर्व गोष्टी पुरविल्या आहेत तसेच जेवन करताना सामाजीक अंतर ठेवुन जेवायला दिले जात आहे.मठातील प्रशासन या गोष्टीसाठी कटिबध्द आहे.आम्ही वैयक्तीक या गोष्टीकडे लक्ष्य ठेऊन आहोत असे महास्वामीजींनी सांगितले.

 

वैजनाथ स्वामी यांनी महास्वामीजी यांना जागतीक महासंकट कोरोना या संकटात सरकारला आपल्या मठातर्फे काही आर्थिक तथा इतर काही मदत आपन करनार आहात का हे विचारले असता महास्वामीजी लवकरच पंतप्रधान यांचे नावे केंद्र सरकारला दोन लाख रूपये तथा कर्णाटक राज्य सरकारला पाच लाख रूपयाची भरीव आर्थिक मदत करनार असल्याचे सांगितले आहे.सध्या सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे आम्हाला बाहेर पडने शक्य नाही त्या मुळे आम्ही स्थानिक तहसिलदार यांना या बाबद सुचना दिली आहे.आर्थिक मदतीती घोषणा करावी असे सांगितले आहे.नांदेड येथिल 35 भाविकांची काळजी करू नका कोणत्याही पध्दतीची गैर सोय होनार नाही याची पुर्ण जबाबदारी आमची आहे आहे.त्यांना या ठिकानावरून सुखरूप नांदेड येथे परत जान्यासाठी स्थानिक प्रशासनाने मदत करावी असे सांगण्यात आले आहे.