कोरोनाच्या आड मुखेडात किराणा व मेडीकल वस्तु आव्वाच्या सव्वा विक्रीने , प्रशासनाचे दुर्लक्ष ; लक्ष देण्याची गरज

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र मुखेड
मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

कोरोना विषाणुमुळे सध्यास सगळीकडे लॉकडाऊन असल्याने मुखेडातील काही मेडीकल व किराणा दुकानदार आपल्या दुकानातील माल आव्वाच्या सव्वा विक्री करीत असल्याचे चित्र मुखेडात दिसत आहे. यामुळे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

मुखेडात किराणा व मेडीकल दुकाने काही कालावधीत पुरतीच चालु असुन याचाच फायदा घेत काही व्यापारी ग्राहकांची अक्षरश: लुट करीत आहेत यामुळे आधीच काम नसलेल्या गोर गरीब जनतेचे हाल होताना दिसत आहे पण याकडे प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे की काय ?  असा सवाल जनतेतून उपस्थित केला जात आहे.

मेडीकल मधील गोळया,सॅनटराईज, साबणे किंमतीपेक्षा आधिक तर फ्रिच्या वस्तु देखील किंमती लावून ग्राहकांना दिल्या जात असल्याचे ग्राहकांकडून बोलल्या जात आहे. यामुळे स्थानिक प्रशासनाने व अन्न व औषध विभागाने लक्ष देऊन संबंधीत दुकानदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी ग्राहकाकडून केली जात आहे.


     तक्रार केल्यास कार्यवाही – तहसिलदार

                 ग्राहकांनी माल खरेदी केल्यानंतर पावती घ्यवी पावती देत नसल्यास संबंधीत दुकानदाराचे नाव सांगावे अथवा तक्रार करावी. दुकनदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

काशिनाथ पाटील, तहसिलदार मुखेड


              ‘वितरक, विक्रेत्यांनीही अतिरिक्त दर आकारू नये, ही नफा कमावण्याची नव्हे, समाजाप्रति जबाबदारी, बांधीलकी सिद्ध करण्याची ही वेळ आहे. या काळात सर्वांचे सहकार्य आवश्यक करावे
 
           प्रा. विनोद आडेपवार
             नगरसेवक, मुखेड