उपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे एक जण विलगीकरण कक्षात

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर/विशाल पवार

देगलूर तालुक्याजवळच असलेल्या मुखेड तालुक्यातील एक युवक नवी मुंबई (वाशी) येथील महात्मा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत असलेला एक विद्यार्थी सोमवारी 23 मार्च रोजी सकाळी देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. त्याची माहिती घेतली आता तो विद्यार्थी दिनांक १६ मार्च रोजी नवी मुंबई येथून खासगी बसने प्रवास करून नांदेड येथे आला व नांदेडहून देगलूर मार्केट तो मरखेल पासून जवळच असलेल्या बेन्नाळ तालुका मुखेड येथे आपल्या गावी पोहोचला.त्यानंतर तो उपजिल्हा रुग्णालयात देगलूर येथे दाखल झाला आसता त्याच्या कडून माहिती घेतल्या नंतर ताप, सर्दी, खोकला, जुलाब झाल्याचे कळले आसता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास देखरेखेखाली विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
त्याच्या वर पुढील दोन दिवस उपचार करण्यात येणार असून त्याचा आजार कमी नाही झाल्यास टेस्टिंग किटद्वारे तपासणी करण्यात येणार असल्याचे वैधकीय आधीक्षक डॉ संभाजी पाटील यांनी मराठवाडा नेताशी बोलताना सांगितले.