कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खाजगी दवाखाने बंद

देगलूर नांदेड जिल्हा

देगलूर/विशाल पवार

सद्या देशात नव्हे तर जगात कोरोनाचा थैमान माजला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सर्व हॉस्पिटल चालू ठेवा असा आदेश दिला असताना सुद्धा देगलूर शहरातील काही नामवंत हॉस्पिटल बंद असताना पाहायला मिळत आहे.

शहरातील कद्रेकर हॉस्पिटल हे आशावादी हॉस्पिटल म्हणून लोकांचा पाहण्याचा दृष्टीकोन असूनही गेल्या दोन दिवसापासून हे हॉस्पिटल बंद आहे हे पाहताच प्रतिरूप शासकीय दवाखाना म्हणून ओळखला जाणारा जनसेवा हॉस्पिटल सुद्धा बंद आहे. या सारखे शहरातील अनेक दवाखाने बंद असताना पाहायला मिळत आहेत. हे सर्व पाहता नागरीकामध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. हे डॉक्टर काय व्यवसाय म्हणून दवाखाने चालू करतात की सेवा म्हणून अशी चर्चा सर्वसामान्य लोकामध्ये होत आहे.आशा या मोठ्या आजारावर सेवा देण्याऐवजी हे लोक हॉस्पिटल बंद ठेऊन आराम करत आहेत.हे दवाखाने चालू ठेवण्याचा आदेश शासनाने त्याना द्यावी अशी मागणी करत आहेत तसेच डॉक्टराच्या या वागण्याबद्दल सोशल मीडिया वर खुप मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे.