कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर भरला अफवांचा बाजार…

देगलूर नांदेड जिल्हा

 

देगलूर/विशाल पवार

सध्याच्या परिस्थीतीत संपूर्ण जग कोरोना नावाच्या महामारी पासून सुटका मिळवण्यासाठी लढत अाहे. या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशभरात “लाॅकडाऊन” ची घोषणा केली आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात पुर्णतः संचारबंदी लागू करून कलम १४४ लागू करण्यात आला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू असल्यामुळे लोकांच्या हाताला काही कामच नाही. सर्व प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करत आपल्या घरीच बसून दिवसभर सोशल मीडियाचा वापर करत आहेत. परंतु या सोशल मीडियावर चांगल्या गोष्टी सोबतच अनेक अफवांचा प्रचार व प्रसार खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे.
काल मध्यरात्री अचानक सोशल मीडिया माध्यमांनवर अशीच एक अफवा पसरविण्यात आली. या अफवेच्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून ग्रामीण व शहरी भागातील काही लोकांनी स्वतः ला नाहक त्रास देत रात्री च्या वेळ भयभित वातावरणात रात्र काढावी लागला तसेच अनेक नागरिकांना देखील या अफवेचा त्रास सहन करावा लागला.
परंतु याच सोशल मीडियावर काही सुशिक्षित नागरिकांच्या वतीने या अफवेचे खंडण देखील करण्यात आले. व अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्यांवर पोलिस प्रशासनाच्या वतीने गंभीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी देखील सोशल मिडीयावर होताना पहायला मिळत आहे.

चौकट
••••••••••••••••••••••••••••••••••

सोशल मीडिया माध्यमांवर कोणीही अफवा पसरवून जनतेत गैरसमज निर्माण करु नये. अफवांचे एसएमएस, फेक व्हिडिओ फॉरवर्ड करुनये असे मैसेज अथवा व्हिडिओ
आल्यास त्या बाबत खरे-खोटे पाहुन सद विवेक बुद्धि चा वापर करुन अफवा पसरणार नाहीत या साठी असे मैसेज दुसर्याला पाठवू नयेत अफवा पसरवणारे मैसेज पाठवणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येईल. व सध्या कोणत्याही महत्वाच्या काम व्यतिरिक्त रस्त्यावर फिरू नये. विनाकारण सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास गंभीर कार्यवाही केली जाईल….

भगवान धबडगे
(वरिष्ठ पोलीस निरीक्षक पो.स्टे देगलूर)