मुखेडात मेडीकल कीराणा दुकानसमोर आखली रांगोळी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड / संदिप पिल्लेवाड

जगभरात कोरोणा विषाणुने धुमाकुळ घातला आहे. त्यातच कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुर्ण भारत देशात पंतप्रधान मोदी यांनी दि. २१ मार्च पासुन संचारबंदी लागु केली आहे. या संचारबंदीत नागरिकाला आत्याआवश्यक वस्तु आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागत आहे.
संचारबंदीत आत्याआवश्यक सुविधा म्हणजेच मेडिकल, किराणा, बँक, आणि भाजीपाल्याचे ठेले चालु ठेवण्यात आले आहेत.
कोरोणा विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखेडात मेडीकल कीराणा दुकानासमोर रांगोळी आखल्याने ग्राहकाने त्या गोल व चौकोनी डब्यात रांगेत उभा राहीन सामान खरेदी करताना दिसत आहेत.