पोलिसांनी सामान्य जनतेला मारहाण करू नये – अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

 

नांदेड / वैजनाथ स्वामी

संचार बंदी दरम्यान पोलिसांनी सामान्य जनतेला मारहाण करू नये असे आदेश नांदेडचे अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड यांनी काढले.

संचारबंदी दरम्यान सामान्य जनतेला पोलिसांनी मारहाण केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकले अनेकांनी तर विनाकारण सामान्य जनतेला फोडून काढले याचमुळे हा निर्णय घेण्यात आला. तर विनाकारण नागरिकांना मारहाण झाल्यास पोलिसांवर सुद्धा कार्यवाही करण्यात येईल असे या आदेशात स्पष्ट केले आहे.

नागरिकांनी सुद्धा विनाकारण बाहेर पडू नये.