देशावरील कोरोनाचे संकट जाऊ दे म्हणत गुढीपाडवा साजरा 

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
यंदाच्या गुढीपाडव्याला कोरोनाचं ग्रहण लागल्याने देशासमोरील कोरोनाचे  संकट जाऊ दे म्हणत  मुखेडात गुढीपाडवा घरीच्या घरीच साजरा करण्यात आला.
हिंदू नववर्षाचं स्वागत महाराष्ट्रात गुढी उभारून करण्याची परंपरा आहे. शिवाय, साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहुर्त समजला जात असल्यानं गुढीपाडव्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. पण यंदाचा गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे साजरा करता येणार नाही याची जाणीव प्रत्येकालाच होती.
‘बाजारात शुकशुकाट ‘
दरवर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होते. झेंडूच्या फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहक प्रचंड गर्दी करतात. तर गुढीपाडव्याला शुभ मुहूर्तावर सोनं खरेदी केलं जातं. पण यंदा बाजारात शुकशुकाट दिसत होता.तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुखेडात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने बाजारातील उलाढाल ठप्प होती.
 दरवर्षी गुढीपाडव्या निमित्तानं 1  ते 2 टेम्पो भरुन फुलं येतात. पण यंदा कोरोनाच्या भीतीने व सरकारच्या लॉकडाऊनमुळे  फुलं आलीच नसल्याने  अनेक छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचा धंदा सुद्धा बसला आहे .
शोभायात्रा रद्द
गुढीपाडव्याला विश्व हिंदू परिषद , बजरंग दल च्या वतीने दरवर्षी शोभायात्रा निघर असते  पण यंदा कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून अगोदरच ही शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे .