हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी धाऊन आले नगरसेवक प्रा.आडेपवार…..सणासुदीच्या दिवशी मदत मिळाल्याने अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

मुखेड – पवन जगडमवार

कोरोनाचा प्रादुर्भाव अन्य नागरीकांना होऊ नये यासाठी पंतप्रधान नंरेद्र मोदी यांनी देशात 21 दिवस लॉकडाऊन जाहीर केले, मात्र हातावरचे पोट असणाऱ्यां गोरगरीब कष्टकरी शेतमजूर भूमीहीन ऑटोरिक्षा चालक नागरिकांना समोर मोठे संकट उभे राहिले अशा नागरिकांन साठी सरकारने काहीतरी उपाय योजना करणे अत्यंत गरजेचे होते मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे काम केले तरच पोट भरेल अन्यथा उपाशी रहावे लागेल अशा नागरिकांना समोर मोठा प्रश्न निर्माण झाले आहे, की बाहेर जाऊन कोरोना ने मरायचे की घरात राहून उपासमारीने मरायचे अशा संकटात एक मदतीचा हात म्हणून मुखेड येथील अपक्ष नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या वतीने लॉकडाऊनमुळे जगणे मुश्किल झालेल्या गोरगरीब, कष्टकरी, शेतमजूर, भुमिहीन,नागरिकांना तांदूळ ,पीठ, अन्य किराणा मालासह आठ ते दहा दिवस पुरेल एवढे धान्य वाटप करण्यात आले .

कोरोनाने जगात थैमान घातले असून याचा परिणाम भारतावरही झाला पण हातावर पोट असलेल्या नागरिक जगायचे कसे ? आज काम केले तर उद्या पोटात अन्नाचा कण जातो अन्यथा उपाशी सुद्धा झोपावे लागते तर अनेक वृद्ध महिला , नागरिक शासनाच्या निराधार योजनेच्या अनुदानावर जगत आहेत.

अशा निराधार महिला व नागरिक यांना शोधून नगरसेवक प्रा. विनोद आडेपवार यांच्या वतीने लॉकडाऊन मध्ये त्यांची सोय व्हावी यासाठी घरगुती लागणारे सर्व किराणा सामान वाटप करण्यात आले. नवीन वर्ष गुढीपाडवा असल्याने प्रत्येकाची परिस्थिती हालाकीची असल्याने सणासुदीच्या दिवशी राशन मिळाल्याने अनेक महिलेच्या डोळयातून आनंदाश्रू आले.
यावेळी मुखेड नगरीचे तहसीलदार मा. काशिनाथ पाटील, पोलीस निरीक्षक मा. नरसिंग आकुसकर ,मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या कामास नगरसेवक प्रा .विनोद आडेपवार यांच्या सह लोकभारत न्युज चे संपादक ज्ञानेश्वरजी डोईजड, प्रमोद मदारीवाले, संदीप पोफळे, विनोद दंडलवाड, योगेश पाळेकर यांनी मेहनत घेतली

 


कोराना गरीबांच्या मुळावर उठली आहे का

देश लॉकडाऊन हे यौग्यच पण देशात असलेल्या असंख्य गोरगरीब ,कष्टकरी ,शेतमजूर , भूमीहीन ,असंगटीत कामगार, बेघर,ऑटोरिक्षा – टॅक्सीचालक, निराधार नागरिक आहेत, त्यांचे हातावरचे पोट आहे काम केले तरच घरात चुल पेटते अन्यथा उपाशी राहवे लागते, अशा नागरिकांना लॉकडाऊन मुळे मोठे संकट उभे राहिले आहे, त्यामुळे या लॉकडाऊन च्या दिवसात हातावरचे पोट असलेल्या नागरिकांना लागणारे अत्यावश्यक असलेले सर्व साहित्य व राशन घरपोच व मोफत उपलब्ध करून दिली पाहिजेत यासाठी सरकारने तात्काळ काहीतरी उपाययोजना करून अत्यावश्यक वस्तू उपलब्ध करून द्यावे अशी मागणी होत आहे