संचारबंदीचे पालन न करणाऱ्या मुखेडात तिघांवर कार्यवाही : जनतेने सहकार्य करावे अन्यथा कार्यवाही – पोनि आकुसकर

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड

 

मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असतानाही रस्त्यावर भन्नाट फिरणाऱ्या तिघांवर मुखेड पोलिसांनी कार्यवाही केली आहे .

कोरोना विषाणूमुळे जनतेचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी केंद्र राज्य सरकार सर्वोपतरी प्रयत्न करीत असताना जनता मात्र संचारबंदीची ऐसी की तैसी करत असतानाचे चित्र दिसत आहे .

पोलिसांनी कितीही समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरीही अनेक नागरिक रस्त्यावर सैराटपणे फिरताना दिसले तर प्रशासनाला दिसतात पोलिसांनी काहींना चोप सुद्धा दिला.

अशाच सैराटपणे रस्त्यावर फिरणाऱ्या व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर कलम 188, 34 नुसार मुखेड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला.


जनतेने सहकार्य करावे – पोनि आकुसकर

कोरोनाचा विषाणू पसरू नये म्हणून जनतेच्या हितासाठी सरकारने नियम लागू केले आहेत. यामुळे विनाकारण जनतेने बाहेर पडू नये अन्यथा नाईलाजस्तव आम्हाला कायदेशीर कार्यवाही करावी लागेल.