संचारबंदीत अवैध दारू विक्री करणाऱ्यावर धाड  महसूल,  पोलीस व उत्पादन शुल्क विभागाची कारवाई 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड / ज्ञानेश्वर डोईजड
     राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी लागू केली असताना मुखेड मध्ये अवैधरित्या विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर दि  24 रोजी सायंकाळी चार वाजता धाड टाकण्यात आली .
       शहरातील अविष्कार बार च्या समोर मोतीनदी जवळ अवैधरित्या विदेशी दारू विक्री करत असल्याची गोपनीय माहिती प्रशासनाला मिळाली सदर माहिती मिळताच महसूल विभाग , उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाच्या वतीने  विदेशी दारू विक्री करताना युवकास रंगेहाथ पकडले.
या धाडीत विदेशी दारू असलेली आयबी , मॅकडॉनल्ड्स कंपनीच्या साधारण 80 बॉटल जप्त केल्या व आरोपीविरोधात पंचनामा करून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
       या धाडीत तहसीलदार काशिनाथ पाटील,  राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अरविंद जाधव , के आर वाघमारे,  पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे,  महसूल विभागाचे सुनील कुलकर्णी , संदीप भुरे , पोलीस कॉ.शिवाजी आडबे , आर एस चव्हाण, एन एम माडपत्ते, नामदेव उलगुलवा ड आदी सहभागी झाले होते.

मुखेड शहरात संचार  बंदी असतानाही अवैध दारू विक्री चालू होती प्रशासनाला कुणकुण लागताच कार्यवाही केल्याने अशा लोकांचे धाबे दनानले आहेत.तर ग्रामीण भागातही असे रॅकेट मोठया प्रमाणात असून ग्रामीण भागातही लक्ष देण्याची गरज आहे.