कंठेवाड परिवाराच्या वतीने टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त* *जनता कर्फ्यू ला मुखेड करांचे शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद*

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड

 

 

मुखेड – पवन जगडमवार

– जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यू संचारबंदी च्या आवाहानाला रविवारी नांदेड जिल्ह्यात व मुखेड तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी शंभर टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद दिले होते, शहरातील कंठेवाड परिवाराच्या वतीने टाळ्या वाजवून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

मुखेड शहरासह तालुक्यातील विविध ठिकाणी जनता कर्फ्यू ला उत्स्फुर्तपणे प्रतिसाद मिळाले संपूर्ण मुखेड शहरात व तालुक्यातील बेटमोगरा, धामणगाव,सलगरा,येवती,हाळणी ,चांडोळा,बोरगाव, मडलापूर, पाळा,जाहूर ,राजूर ,आंबुलगा इत्यादी गावातील ग्रामीण भागात एकही व्यक्ती रस्त्यावर दिसत नव्हते तर मुखेड बस आगारातील सर्व बसेस बंद ठेवण्यात आले होते, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुखेड शहरात व तालुक्यातील नागरिकांनी देखील शंभर टक्के जनता कर्फ्युला प्रतिसाद दिला.सामान्य नागरिकही घराबाहेर निघाले नाहीत .कडकडीत बंद मध्ये शेतकऱ्यांनी सुध्दा आपली कामे बंद ठेवली.व घराबाहेर कोणीही निघाले नसल्याने सर्वञ शुकशुकाट पसरले होते तालुक्यातील बाजारपेठ, किराणा दुकान,हॉटेल, मार्केट बंद करण्यात आले होते, पोलीस निरीक्षक नंर्सिंग आकुसकर यांच्या नेतृत्वाखाली मुखेड येथील पोलीस यंञना रस्त्यावर चौक बंदोबस्त ठेऊन होती, पोलीस व्हँन प्रत्येक गावात फिरून नागरिकांनी घराच्या बाहेर निघू नये यासाठी वारंवार सुचना देत होते , कोरोना या संसर्गजन्य विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च २०२० रविवार रोजी सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत कोणीही विनाकारण घराच्या बाहेर पडू नये किंवा मार्केट उघडू नये असे आव्हान ‘जनाता कर्फ्यूच्या’ माध्यमातून केले होते.त्याला प्रतिसाद म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड शहरासह तालुक्यातील गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आले होते, त्यामुळे रस्त्यावर चोहीकडे शुकशुकाट पसरले होते, जनता कर्फ्यू संदर्भात तहसीलदार काशीनाथ पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले, वैद्यकीय अधिक्षक आनंद पाटील पोलीस निरीक्षक नंर्सिंग आकुसकर सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब मगरे, पोलीस उपनिरीक्षक जी. डी चित्ते पोलीस उपनिरीक्षक अनिता ईटुबोने, गजानन काळे, यांच्या सह आरोग्य विभाग, महसूल विभाग, नगरपरिषद, ग्रामपंचायत, व पोलीस प्रशासनासह सर्व विभागाचे कर्मचारी उपाययोजना करण्यासाठी सरसावले होते.

 


 

मुखेड शहरात बंदोबस्तावर असलेल्या पोलिस बांधव व उपजिल्हा रूग्णालयातील रुग्णांना शेख इस्माईल बागवान यांच्या वतीने फळे नारळपाणी वाटप करण्यात आले यावेळी पत्रकार रियाज शेख, रामदास पाटील,अमजेद शेख अदीजण उपस्थित होते.