कोरोनाच्या भीतीने पुण्याहून आले मुखेडमध्ये हजारो नागरिक    मुखेडमधील मराठवाड्यातून जास्त पुणे, मुंबई येथे नागरिक

ठळक घडामोडी नांदेड नांदेड जिल्हा मराठवाडा महाराष्ट्र मुखेड
प्रशाकीय  यंत्रणा सज्ज पण मनुष्यबळ कमी  उपजिल्हा रुग्णालयात होत आहे तपासणी


मुखेड : ज्ञानेश्वर डोईजड

काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यात सर्वाधिक  पुणे शहरात आढळल्याने मुखेडमधून कामाला गेलेले हजारो नागरिक आता परतीची वाट धरत असून खाजगी ट्रॅॅव्हल्स भरून नागरिक मुखेडकडे येतानाचे चित्र दिसत असून पुण्यासह ईतर महानगरमधून आलेल्या नागरिकांची  उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे तपासणी होत आहे.

मुखेडसह अनेक तालुक्यातील नागरिक सुद्धा पुणे सोडत असून पुण्यात राहून आपणास विषाणूची लागण हाेईलअशी भीती त्यांना वाटत असल्याने पुणे शहर साेडून  मूळ गावी परतत असल्याची माहिती अनेक मजूरदार नागरिकांनी दिली.

 

मुखेड तालुका डोंगराळ भाग असल्याने येथे हाताला काम नाही अनेक युवक सुद्धा शिक्षण शिकून बेरोजगार आहेत येथील नागरिक पुण्यासह मुंबईहैद्राबाद शअशा मोठ्या शहराकडे जाऊन मिळेत ते काम करीत असतात तर अनेक विद्यार्थी नोकरीच्या शोधातही जात असतात काम मिळाले की तेथेच कुठे तरी रूम करून स्थायिक होत असतात पण सध्या कोरोनाच्या भीतीमुळे काम – नौकरी सोडून आपल्या मूळ गावच बरे म्हणून पुण्याहून मुखेडकडे हजारो नागरिक आले आहेत.

प्रशासन याची खबरदारी म्हणून बसस्थानक मध्ये खाजगी बसेस थांबहून आलेल्या प्रवाशांची नोंद करून मुखेड उपजिल्हा रुग्णालयात तपासणी साठी  ट्रॅॅव्हल्ससह सर्व नागरिकांना पाठवीत आहेत. मराठवाड्यात सर्वात जास्त  ट्रॅॅव्हल्स भरून कामासाठी मुखेड तालुक्यातून जात असतात सध्या प्रशासनाची यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसून येते उपजिल्हा रुग्णालयात अनेक नागरिक तपासणीसाठी मोठी रांग करत आहेत पण तेथे मनुष्यबळ कमी असल्याने अनेकांना याचा त्रास सुद्धा होत आहे.

 

…………………..

मुखेडमधील मराठवाड्यातून जास्त पुणेमुंबई येथे नागरिक

मुखेड तालुक्यातून दरवर्षी हजारो नागरिक कामासाठी स्थलांतर होत असतात कोरोनाच्या भीतीने मुंबई पुणे हैद्राबाद यासह अनेक परराज्यात गेलेले हजारोंच्या संख्येने नागरिक मुखेड मध्ये येत आहेत यासाठी प्रभावी यंत्रणा नसल्याने मुखेड तालुक्यात कोरोनाची भीती जास्त असल्याची दिसून येते.