ऐतिहासिक जनता कर्फ्युला मुखेडात शंभर टक्के प्रतिसाद कोरोनाच्या बचावासाठी नागरिक घरातच ; रस्ते

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड /  संदीप पिल्लेवाड
        कोरोना (कोवीड १९) या संसर्गजन्य विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी माननीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला २२ मार्च  रोजी जनता कर्फ्युला मुखेड शहरासह तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.शहरातील रस्त्यावर पहील्यांदाच शुकशुकाट पहाण्यास मिळाला आहे.
यासाठी आरोग्य विभाग, महसुल, नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांनी प्रतिबंधात्मक उपाय करण्यासाठी मोठी यंत्रणा राबविण्यात आली.
         मुखेड तालुका डोंगराळ भाग असल्याने येथील नागरिक रोजगारासाठी येथुन मुंबई पुणे व ईतर महानगरात कामासाठी गेले आहेत आणि कोरोना विषाणूमुळे त्यांच्यावर गावी परत येण्याची वेळ आली आहे त्यामुळे मुंबई पुणे व ईतर महानगरातुन येणा-या नागरिकांची संख्या मुखेड तालुक्यात जास्त आहे.
         येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य विभागाच्या वतीने मुंबई , पुणे व ईतर महानगरातुन आलेल्या आतापर्यंत ३९० रुग्णाची तपासणी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आली.तालुक्यातील जांब (बु), बेळी व पांडुर्णी या तीन गावामधील पुण्याहुन आलेले तीन सर्दी खोकला असलेले संशयीत रुग्ण आढळुन आल्याने यातील दोघांना तपासणीसाठी नांदेड जिल्हा रुग्णालयात पाठवले व एकाची मुखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले.
        राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी म्हणलेल्या खेड्याकडे चला या विचाराचे अनुकरण होत असल्याचे चित्र दिसत आहे. शहरासह खेड्यापाड्यात प्रशासन व नागरिक या कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण स्व:तची काळजी घेत आहेत व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनात शंभर टक्के सहभागी होऊन घराच्या बाहेर कोणीही पडत नाहीत. मुखेड शहरासह ग्रामीण भागातील मुक्रमाबाद , बाराहाळी , जांब या मोठ्या बाजारपेठेसह कडकडीत
बंद असल्याचे चित्र पहिल्यांदाच पहावयास मिळाले.
         यासाठी तहसिलदार काशीनाथ पाटील, वैद्यकीय अधिक्षक आनंद पाटील, मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे, व पोलीस निरीक्षक नरसिंग  आकुसकर , सहाय्यक पोलीस निरिक्षक भाऊसाहेब मगरे पोलिस उपनिरिक्षक जी.डी. चित्ते, गजानन काळे व अनिता ईटुबोने यासह सर्व विभागाचे कर्मचारी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सरसावले आहेत.