अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाच्या पाठपुराव्यामुळे ऊझबेकिस्थानमध्ये अडकलेले महाराष्ट्रातले 40 डॉक्टर भारतात परतले

ठळक घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रीय

करमाळा येथिल 13 डॉक्टर व राज्यभरातुन एकुन 40 डॉक्टरांची टिम 10 मार्च रोजी परदेश यात्रासाठी म्हणुन ऊझबेकिस्थान या देशात फिरायला गेले होते.

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस ने जगाला वेठीस घेतले आहे. या मुळे अनेक देशातील विमानसेवा बंद केली आहे.या मुळे हे सर्वजन 16 मार्च रोजी बंद झालेल्या विमानसेवेमुळे ताशकंद या शहरात अडकले.

यांचा प्रवासी विजा 17 रोजी दुपार पर्यंतचाच होता.आता मात्र या सर्वांच्याच चिंतेत वाढ झाली होती.या सर्वांनी आपआपल्या पध्दतीने भारतात संपर्क करण्यास सुरवात केली.यातील डॉ.रामलिंग शेटे यांनी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रिय सचिव प्रवक्ते यांचेशी संपर्क केला.घडलेला प्रसंग सांगितल्यावर त्याच रात्री वैजनाथ स्वामी यांनी अमेरीकेतील उच्चअधिकारी माधव सुलफुले व आयपीएस हरेश्वर स्वामी दिवदमन,आयपीएस अधिकारी सुधिर हिरेमठ पुणे यांचेशी तात्काळ संपर्क करून या सर्वांच्या परतीचे मार्ग लवकरात लवकर मोकळे करावे अशी विणंती केली.माधव सुलफुले यांनी ताशकंद येथिल भारतीय राजदुत डॉ.संतोश झा साहेब यांना संपर्क करून या सर्वांचा प्रवासी विजा वाढवुन दिला.तसेच अखिल भारतीय वीरशैव लिंगायत
महासंघाचे डॉ.विजय जंगम राष्ट्रिय कार्याध्यक्ष यांना या घटनेची माहीती मिळताच तातडीने खा.विनय सहस्त्रबुध्दे यांचेशी थेट संपर्क साधुन परराष्ट्र मंत्रालयास हि माहीती दिली व लवकर या सर्वांना भारतात आनावे या करिता विणंती केली. वैजनाथ स्वामी यांनी
दिनांक 18 रोजी निलमताई गोर्हे यांना थेट संपर्क करून सदर प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांना मदत करन्यासाठीचे पत्र सादर केले.
तसेच प्रधानमंत्री कार्यालात थेट संपर्क करत पिएमओचे संबंधित अधिकारी यांना कल्पना दिली.
दिनांक 20 रोजी खा.संभाजीराजे भोसले यांनी देखिल या बाबतीत केंद्रीय मंत्र्याची भेट घेऊन पाठपुरावा केला.
या सर्व प्रयत्ना नंतर भारत सरकारने आदेश दिले व दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 9:30 वा हे सर्व महाराष्ट्रातील 40 डॉक्टर व भारतातील एकुन 114 लोक दुपारी 1:30 दिल्ली येथे पोहचले.
आणि आज दिल्ली ये पुणे येथे
सुखरूप हे सर्वजन पोहचले आहेत
या सर्वांच्या चेहर्यावरचा आनंद व शब्दात न सांगता येनारा आहे.