मुखेडात पुणे, मुंबईहून आलेल्यां प्रवाशांची होणार तपासणी –  तहसीलदार काशीनाथ पाटील   मुखेड बसस्थानकातही पुणे, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी             बसस्थानकात ३११ रुग्णांची तपासणी 

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड/ ज्ञानेश्वर डोईजड

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या असून त्यांच्या आदेशानुसार  मुखेड  मध्ये सुद्धा पुणे, मुंबई ,हैद्राबाद किंवा इतर महानगरांमधुन आलेल्यां प्रवाशांची मुखेड बसस्थानकासह नागरीकांची तपासणी घरोघरी जाऊन आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार आहेत अशी माहिती मुखेडचे तहसीलदार काशीनाथ पाटील यांनी दिली.

मुखेड तालुका डोंगराळ भाग असून येथील  हजारो नागरिक कामाच्या शोधात मोठ्या शहराकडे अतिशय जास्त प्रमाणात जातात तर काही अंशी विद्यार्थी शिक्षणानिमित्त पुणे,मुंबई, औरंगाबाद , हैद्राबाद आदि महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात राहतात.

मोठ्या शहराकडून मुखेड मध्ये कोरोनाचे रूग्ण आढळून नये व त्याचा फैलाव होऊ नये यासाठी प्रशासनाने बाहेरगावांवरून येणाऱ्या नागरीकांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. या तपासणीच्या कामासाठी तहसीलदार काशीनाथ पाटील यांच्यासह  गटविकास अधिकारी के व्ही बळवंत , वैद्यकीय अधीक्षक डॉ आनंद पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ रमेश गवाले , मुख्यधिकारी त्र्यंबक कांबळे अनेक कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

………………………. …….
मुखेड बस्थानकात पुणे, मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी
          मुंबई , पुणे येथून खाजगी ट्रव्हल्स व महामंडळाच्या बसेसमधून आलेल्या प्रवाशांची तपासनी मुखेड प्रशासनच्या वतीने करण्यात येत असून काही लक्षणे दिसल्यास त्या रुग्णास तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली आहे.