अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तात्काळ मदत देण्याची मागणी 

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन क्यादरकुंटे     

मुखेड तालुक्यात दि.18 रोजी सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस पडला त्यात तालुक्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले. या अवकाळी पाऊस व गारपीटीने झालेल्या पिकांचे नुकसानीचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना तात्काळ मदत करावी अशी मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

यावेळी बालाजी पाटील सांगवीकर , रमाकांत पाटील जाहुरकर ,माधवराव पाटील तुपदाळकर,सुरज पाटील बोडके, निशीकांत पाटील हातराळकर यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.