महानगरातील सर्व खासगी ऑफिसेस बंद राहणार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुंबई, 20 मार्च : अर्धी मुंबई बंद असली तर बस आणि रेल्वे सेवा बंद होणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबई, पुणे आणि महानगरातील  सर्व खासगी कार्यालयं बंद राहणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. राज्यात सर्व दुकानं आणि व्यापार बंद राहतील पण जीवनावश्यक  वस्तूंची कमतरता भासणार नाही अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

ते पुढे म्हणाले की, संपूर्ण जगाला जगण्यासाठी घरात राहण्याची वेळ आली आहे. सगळ्या देशातील पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन केलं आहे. कोरोनाविरुद्ध जागतिक युद्ध सुरू आहे. त्यावर मात करण्यासाठी सर्व लोक पुढे येत आहे. त्यांचे मी आभार मानतो. चित्रपटातील कलाकारांनी अत्यंत योग्यपणे जनजागृती करत आहे.

आपल्या सगळ्यांच्या हितासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. यातून काही गोष्टी तुम्हाला खुपतील पण काही बदल करावे लागतील. बस आणि लोकल मुंबईचा श्वास आहे. पण बस आणि रेल्वे बंद होणार नाहीत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.