कोरोना विषाणूचा संसर्ग पसरू नये म्हणून नरसिंगवाडी येथे शेतकऱ्यांना मोफत मास्क वाटप.

इतर बातम्या क्रीडा नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या

उदगीर : प्रतिनिधी:

सध्या संपूर्ण देशात कोरोना विषाणूंची लागण होण्याच्या भीतीने शहरी भागातील नागरिक मोठ्याप्रमाणावर मास्क आणि सेनीटायजर चा वापर करताना दिसून येत आहेत वापर वाढल्यामुळे मास्कचा तुटवडा होऊन मास्कचे भाव आता गगनाला भिडले आहेत साधारण दहा ते वीस रुपयाला मिळणारे मास्क आता 30 ते 40 रुपये ला मिळू लागले आहेत,आणि ही बाब सर्वसामान्यांना परवडणारी नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, भाजीविक्रेते यांना मास्क वापरने खर्चिक वाटत असल्यामुळे या मास्कचा वापर करत नसल्याची बाब उदगीर येथील युवक सध्या डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या वेदांत श्रीगिरे या तरुणाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वखर्चातून एक हजारापेक्षा अधिक मास्क घरीच तयार करून वाटप करण्यास सुरुवात केलीय त्यातलाच एक भाग म्हणजे शुक्रवार (दि:20) रोजी उदगीर तालुक्यातील नरसिंगवाडी येथे मातोश्री शारदाबाई पवार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सतत सामाजिक कार्यात व विद्यार्थी चळवळीत सक्रिय असणाऱ्या श्रीकांत जाधव यांच्या विनंतीमुळे नरसिंगवाडी येथील शेतकऱ्यांना मास्क वाटप करून मास्क कसा बनवावा याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.

एक मास्क साधारण सात ते आठ तास वापरात येऊ शकतो पुन्हा ते मास्क बदलावा लागतो दिलेला मास्क खराब झाल्यानंतर पुन्हा हे शेतकरी , भाजीविक्रेते ,ज्येष्ठ नागरिकांना मास्क खरेदी करून वापरणे हे न परवडणारे वाटत असल्यामुळे ते वापरणार नाहीत ही बाब लक्षात घेऊन त्यांनीअगदी दीड रुपयात टिशु पेपर वर रबर बँड चा वापर करून घरच्याघरी मास्क कसा तयार करायचा याचे प्रात्यक्षिक व कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी घ्यावयाच्या काळजी ची माहिती त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिली.

यावेळी “आधार ग्रुप” चे अध्यक्ष श्रीकांत जाधव यांनी हा उपक्रम घेण्यामागचा उद्देश उपस्थित नागरिकांना समजून सांगितले व या कोरोना विषाणूचा प्रतिकार कश्या पद्धतीने केला पाहिजे याबद्दल थोडक्यात मार्गदर्शन केले.यावेळी गावातील ग्राम पंचायत सदस्य वामन पाटील,बबनराव नरवटे,वीरभद्र हालकुडे,लक्ष्मण कोलेवाड,डॉ. अभिजित नरवटे,पांडुरंग कोलेवाड व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.