कोरोनाशी दोन हात करण्यासाठी सज्ज व्हा-प्रा.डॉ.महेश पेंटेवार

इतर लेख संपादकीय

मित्रहो सध्या कोरोना वायरस मुळे शाळा, महाविद्यालय, कार्यालय, सार्वजनिक ठिकाण बंद आहेत. याला कृपया सुट्टी समजू नका. कोरोना विषाणू पसरू नये लोकांचे त्यापासून संरक्षण व्हावे म्हणून आपणास घरात थांबून विषाणू बाधित लोकापासून अलिप्त ठेवण्याची पद्धत अवलंबण्यात आलेली आहे. आता आपण कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात आहोत. सर्वांनी यासाठी सहकार्य केल्यास आपण याचा फैलाव थांबू शकतो. आजच भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदींनी जनतेला आवाहन केले आहे २२ मार्च २०२० रोजी सकाळी ०७ ते रात्री ०९ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू उत्स्फूर्तपणे पाळावा व सायंकाळी ०५ वाजता जे डॉक्टर्स आपल्या जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र रुग्णांची सेवा करण्यासाठी मेहनत घेत आहेत त्यांच्या करिता पाच मिनिट त्यांचे आपल्याच घरी थांबून अभिनंदन करूया. कोरोना व्हायरसला कोणीही घाबरू नये व कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कोरणा व्हायरसला घाबरण्यापेक्षा त्याच्याशी दोन हात करण्याची तयारी करूया. याकरिता कोरोना वायरसची पार्श्वभूमी समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कोरोना हा चीन प्रांतातील वुहान या शहरात सर्वप्रथम आढळून आला वुहान मध्ये मास विक्रीच्या बाजारातून डिसेंबर २०१९ मध्ये त्याचा प्रसार झाला कारण तिथे सर्व प्रकारच्या प्राण्यांची मांस विक्री केली जाते. वटवाघुळ किंवा साप यांच्या शरीरातून हा वायरस मानवाच्या शरीरात आलेला आहे व मानवाच्या श्वसन क्रियेद्वारे सर्व ठिकाणी पसरायला लागला आहे. सुरुवातीच्या काळात हा आजार चार ते पाच देशा पुरता मर्यादित होता. परंतु आता हा आजार ५५ देशापेक्षा जास्त देशांमध्ये फैलावला आहे. त्यात आपणही एक आहोत. कोरोना वायरस काय आहे व त्यापासून नेमके काय होते याविषयी जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे हा श्वसनाच्या ग्रुप मधला वायरस आहे याचे प्रामुख्याने सात प्रकार आहेत अल्फा, बीटा, गॅमा, थिटा इत्यादी नावे आहेत परंतु डिसेंबर २०१८ मध्ये चीनमध्ये आढळलेला वायरस हा कोरोना च्या फॅमिलीतला असल्याकारणाने त्यास “नॉवेल कोरना” असे नाव देण्यात आले आहे. नंतर याचे नामकरण कोविड १९ असे करण्यात आले आहे. कोरोना व्हायरस हा श्वसन संस्थेशी निगडित आहे. श्वसनातुनच आपणास सर्दी, शिंका, खोकला यातून आपल्या तोंडातून उडणारे तुषार असतात आणि या मार्फतच त्याचा प्रसार होतो किंवा आपल्या तोंडातील तुषार जर एखाद्या पृष्ठभागावर पडले असतील उदाहरणार्थ भिंत, टेबल, मोबाईल इत्यादीवर पडले असतील व आपल्या हाताने त्या वस्तूला स्पर्श केला व तोच हात जर आपण आपले डोळे, नाक, तोंड साफ करण्यासाठी वापरला तरच या व्हायरसचा प्रसार होऊ शकतो. ज्या वेळी वायरस शरीरात प्रवेश करतो आणि पुर्ण रोग होईपर्यंतचा काळ म्हणजे इंनकुबेशन कालावधी हा आठ ते चौदा दिवसाचा आहे. हा वायरस शरीरात प्रवेश केल्यानंतर ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता जास्त आहे त्यांना सौम्य, किरकोळ स्वरूपाची लक्षणे दिसतात. जसे की सामान्य तापाची लक्षणे असतात सर्दी खोकला ताप. जर एखाद्याची रोग प्रतिकारक्षमता कमी असेल तर या आजाराचे गंभीर स्वरूप आपणास पहावयास मिळते यात तीव्र स्वरुपाचा ताप, निमोनिया श्वसनास त्रास, घसा दुखणे, तीव्र थकवा अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात. याकरिता आपण काय काळजी घ्यायची हे जाणून घेणे आवश्यक आहे सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा घाबरून जाऊ नका कारण वर्षभरात आपणास कित्येक जणांना तरी सर्दी-खोकला-ताप यासारखे आजार नेहमीच असतात कोरोना वायरस चा उगम भारतात झालेला नाही आणि तसा एकही रुग्ण नाही जे कोरोना बाधित रुग्ण आहेत ते परदेशातून फिरून मायदेशी परतले आहेत आणि त्यांनाच कोरोनाचे लक्षणे दिसून आलेली आहेत आणि अशा रुग्णा कडूनच कोरोना वायरसचा प्रसार होताना दिसून येत आहे, म्हणून आपणास घाबरण्याचे कारण नाही कारण बाहेर देशातून येणाऱ्या प्रवाशांना विमानतळावरच वेगवेगळ्या चाचण्या करून सामान्य माणसापासून त्यांना दूर ठेवले जात आहे व नॉर्मल असतील तर त्यांना घरी पाठवत आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सर्दी, ताप, खोकला, घसा-दुखी ला घाबरू नये, परंतु याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे यासाठी आपण घराबाहेर पडू नये जर आपणास अत्यंत आवश्यक असेल अशाच वेळी आपण घराबाहेर पडावे बाहेर पडताना खूप महागाचा मास्क लागतो असे नाही आपण रोज वापरतो तो हातरुमाल जर आपल्या चेहऱ्यावर बांधला तरी चालतो. वेळोवेळी तसेच जेवणापूर्वी किंवा बाहेरून आल्यानंतर प्रत्येक वेळेस साध्या साबणाने २० सेकंद आपले हात जर धुतले तरी आपणास याचे संक्रमण होणार नाही जोपर्यंत आपण हात धुवनार नाही तोपर्यंत घरात कुठेही हात लावू नका. आपणास सर्दी-खोकला-ताप झालेला असेल तर घराबाहेर पडूच नका आणि पडायचे असेल तर हात रुमाल बांधूनच घराबाहेर पडा कुठल्याही वायरस पासुन संरक्षण करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक क्षमता ही चांगली असल्यास आपणास काळजी करण्याची गरज नाही याकरिता दिवसभरात किमान सहा ते आठ ग्लास पाणी प्या सात ते आठ तास झोप घ्या. आहारात ताज्या फळभाज्या व सी व्हिटॕमीन युक्त फळांचा वापर करा जसे की मोसंबी, संत्री, आवळा, टमाटे, मोड आलेली कडधान्य, दही-ताक (पण रात्रीला टाळा) अद्रक-लसूण इत्यादींचा वापर करा व आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवा. याकरिता दररोज व्यायाम करणे ही तितकेच आवश्यक आहे तेव्हा कोरोनाला घाबरून न जाता त्याच्यापासून संरक्षण करुया व प्रसार रोखण्यास मदत करूया.

प्रा.डॉ. महेश पेंटेवार

प्राणीशास्त्र विभाग, ग्रामीण (कला,वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर,

कोटग्याळ ता. मुखेड जि. नांदेड 9423440696.