कोरोना इफेक्ट : विवाहस्थळावरून वधू-वरांसह वऱ्हाड्यांना बाहेर

ठळक घडामोडी महाराष्ट्र

विरकुमार हिरेमठ

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर 50 पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यास बंदी असतानाही होटगी रस्त्यावरील एका मंगल कार्यालयात दोनशेपेक्षा जास्त लोक एकत्रित आल्याचे समजल्यावर महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांच्या संयुक्त पथकाने जागेवर जाऊन कारवाई केली.

विवाहाचा विधी पूर्ण झाल्याने वधू-वरासह सर्वांना बाहेर काढत पोलिसांनी सभागृह ताब्यात घेतले. आता संबंधित मंगल कार्यालय व्यवस्थापक व मालकाविरुद्ध पोलिस कारवाईचे काम सुरु करण्यात आले आहे. विवाहस्थळावरून वधू-वरांसह वऱ्हाड्यांना बाहेर काढण्याची ही राज्यातील पहिली घटना असल्याचा दावा महापालिका अधिकाऱ्यांनी केला.