पुणे मुंबईवरून आलेल्यांची होणार तपासणी , जिल्हाभरात आरोग्य कर्मचारी जाणार घरोघरी – जिल्हाधिकारी

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या महाराष्ट्र

 

नांदेड / वैजनाथ स्वामी

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डाॕ.विपीन यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना जारी केल्या आहेत.यानुसार काही दिवसांत पुणे.मुंबई ,हैद्राबाद किंवा इतर महानगरांमधुन नांदेडला आलेल्या नागरीकांची तपासणी आरोग्य विभागाचे कर्मचारी करणार आहेत.ग्रामीण भागातही आलेल्या नागरीकांची तपासणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी करणार आहेत.
जिल्हात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डाॕ.विपीन यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ हा दि. १३ माॕर्चपासुन लागु करून खंड दोन.तीन.व चारमधील तरतुदीनुसार दि. १४ माॕर्चपासुन अधिसुचना निर्गमित केली आहे.या साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकार्यांना शासनाने सक्षम प्राधिकारी म्हणुन घोषित केले आहे.
आजपर्यंत वेगवेगळ्या आठरा आदेश काढुन उपाययोजना सुचविल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातुन हजारो नागरिक कामाच्या शोधात .तर विद्यार्थी शिक्षणानिमित्त पुणे,मुंबई .औरंगाबाद .हैद्राबाद आदि महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात राहतात या शहरात तेथील प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाय जारी केल्यामुळे सर्वांनीच आपल्या गावाचा रस्ता धरला.महानगरात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने त्याचा फैलाव होऊ नये.यासाठी प्रशासनाने बाहेरगावांवरून येणाऱ्या नागरीकांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.


        याबाबत लोकभारत चे सहसंपादक वैजनाथ स्वामी यांनी दि 18 रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले होते.