विजासह वादळवारा अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान, महसुल विभाग नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करणार का?

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा मुखेड

 

बाराहाळी: पवन कँदरकुंठे

मुखेड तालुक्यातील आजच्या झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांनाही या अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. यामुळे  शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याची शक्यता बळावली आहे.

या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे आंब्याचा मोहर व फळे गळून पडली आहेत. अगोदरच काही अंशी झालेला पेरा. आणि त्यात आलेले गहू, हरभरा, ज्वारी, करडई, मका ही पीकं काढणीच्या अवस्थेत आहेत.

 

या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीमुळे अगोदरच हतबल झालेल्या शेतकऱ्यांचे कंबरडे मोडलं आहे. त्यामुळं महसुल प्रशासनाने तात्काळ दखल घेत झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांतुन व्यक्त केली जात आहे.