दिव्यांगाचे तहसीलसमोर बोंबाबोंब अर्धनग्न आंदोलन निराधार मंजूर करणे, दिव्यांग निधी देण्याची मागणी

नांदेड जिल्हा नांदेडच्या बातम्या मुखेड
मुखेड : संदीप पिल्लेवाड
               प्रशासनाच्या दुर्लक्षाने दिव्यांगाचे  निराधार मंजूर होत नसून व ग्राम पंचायतचा  दिव्यांग निधी ही मिळत नाही या मागण्या मंजूर कराव्यात यासह विविध मागण्यासाठी मुखेड तहसील कार्यालयासमोर  दिव्यांग आघाडीच्या वतीने राहूल साळवे यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब व अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
             दिव्यांग कल्याणकृती आराखड्यातील सुचनेनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायती) स्वउत्पन्नातील एकूण निधीपैकी पाच टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसनासाठी राखून ठेवून त्याच कारणासाठी खर्च करावा लागतो. या निधीतून दिव्यांगांना विविध प्रकारचे सामूहिक तसेच वैयक्तिक लाभ देण्यात येतात. पण मुखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व नगर परिषदेने दिव्यांग लाभार्थ्यांना राखीव निधी वाटप केला नाही.
          या बाबतीत दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष पिंटू उर्फ देविदास बद्देवाड यांनी वारंवार लेखी तोंडी तक्रार करुनही संबंधित विभागाने निधीचे वाटप केले नसल्याने दिव्यांगाना याचा मोठा फटका बसत आहे. त्यामुळे तत्काळ निधी द्यावा या मागणीचे निवेदन मुखेडचे  तहसीलदार काशीनाथ पाटील  यांना देण्यात आले.
         यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष देविदास उर्फ पिंटू बद्देवाड, तालुका सचिव गजानन इंगोले, माधव शिरुळे, नारायण शाहू, परमेश्वर शेटवाड,दलीत कांबळे, ईर्शाद चोंडीकर आदीसह तालुक्यातील अनेक दिव्यांगानी या आंदोलनात सहभागी झाले होते