कोरोना इफेक्ट : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयं सात दिवसांसाठी बंद

ठळक घडामोडी महाराष्ट्र

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Corona effect Govenment office Close) आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. यानुसार पुढील सात दिवस सरकारने कार्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अनेक सर्वसामान्य नागरिक कामानिमित्ताने सरकारी (Corona effect Govenment office Close) कार्यालयात जात असतात. त्यामुळे सरकारी कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारने दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी महत्त्वाची ठिकाणं बंद करण्यात येत आहेत. यामुळे सर्व सरकारी कार्यलये पुढील सात दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.