40 भारतीय डॉक्टर्स उझेबेकिस्थान या देशात अडकले

ठळक घडामोडी नांदेड जिल्हा महाराष्ट्र राष्ट्रीय

नांदेड : प्रतिनीधी

10 मार्च रोजी करमाळा येथिल 13 डॉक्टर्स सहीत एकुन 40 भारतीय लोक फिरायला रसिया ताश्कंद उझेबेकिस्थान या ठिकानी गेले आहेत.
कोरोना या व्हायरस मुळे जगभरातील सर्वच देशात कडक नियम लागु केले आहेत.या मुळे ताश्कंद येथिल विमानसेवा बंद करण्यात आली आहे.त्याचा फटका 40 भारतीय यात्रेकरूंना बसला आहे. काल या सर्वांचा टुरिस्ट विजा संपला असुन हे सर्वजन मोठ्या अडचनीत सापडले आहेत.
या टिम मधिल डॉ.रामलिंग शेटे यांनी अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे राष्ट्रिय सचिव प्रवक्ता वैजनाथ स्वामी यांचेशी फोनवर संपर्क केला असता भारतातुन मदतीची मागनी केली.
वैजनाथ स्वामी यांनी तातडीने अमेरीका सहीत रसिया येथिल भारतीय राजदुत तथा उच्चअधिकारी यांचेशी रात्रीच संपर्क केला व तातडीने मदत करावी अशी विणंती केली आहे.
अमेरीकेतील भारतीय राजदुत माधव सुलफुले यांनी तातडीने उझेबेकिस्थान येथिल भारतीय दुतावास कार्यालयात संपर्क करून 40 भारतीय लोकांना सहकार्य करन्याचे आदेश दिले आहेत.
आज प्रधानमंत्री कार्यालयात संपर्क करून या 40 लोकांना तातडीची मदत करून भारतात परत आनावे अशी मागणी वैजनाथ स्वामी करनार आहेत.