प्रशासनाचे दुर्लक्ष दिव्यांग निधी कधी वाटप होणार दिव्यांगाचा उद्या अर्धनग्न व बोंबाबोंब, आंदोलन

नांदेड जिल्हा मुखेड

मुखेड : पवन जगडमवार

मुखेड प्रशासनाच्या दुर्लक्षाने दिव्यांगासाठी राखीव निधीचे वाटप झाले नाही. यामुळे अनेक लाभार्थी वंचित आहेत. प्रशासनाच्या आनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ दिव्यांग आघाडीच्या वतीने दिव्यांग नेते राहूल साळवे यांच्या नेतृत्वाखाली दि. १७ मार्च रोजी तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष पिंटू बद्देवाड यांनी दिली.

दिव्यांग कल्याणकृती आराखड्यातील सुचनेनुसार ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्राम पंचायती) स्वउत्पन्नातील एकूण निधीपैकी पाच टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींच्या कल्याण, पुनर्वसनासाठी राखून ठेवून त्याच कारणासाठी खर्च करावा लागतो. या निधीतून दिव्यांगांना विविध प्रकारचे सामूहिक तसेच वैयक्तिक लाभ देण्यात येतात. पण मुखेड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती व नगर परिषदेने दिव्यांग लाभार्थ्यांना राखीव निधी वाटप केला नाही. प्रशासकीय उदासीनतेमुळे दिव्यांग लाभार्थी शासनाच्या निधीपासून वंचित आहेत. याबाबतीत दिव्यांग आघाडीचे तालुकाध्यक्ष पिंटू उर्फ देविदास बद्देवाड यांनी वारंवार लेखी तोंडी तक्रार करुनही संबंधित विभागाने निधीचे वाटप केले नाही.

प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ तहसील कार्यालयासमोर मंगळवार दि. १७ मार्च रोजी अर्धनग्न आंदोलन व बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याचे निवेदन मुखेडचे नायब तहसीलदार पी. डी.गंगनर यांना देण्यात आले. यावेळी भाजपा दिव्यांग आघाडी तालुकाध्यक्ष देविदास उर्फ पिंटू बद्देवाड, तालुका सचिव गजानन इंगोले, माधव शिरुळे, नारायण शाहू, परमेश्वर शेटवाड आदीनी हे निवेदन दिले.