डाॅ.राहुल कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पशुरोग निदान शिबीर संपन्न

नांदेड जिल्हा मुखेड
मुखेड : संदिप पिल्लेवाड
            येथील पशु रुग्णालयात कार्यरत असलेले डाॅ. राहुल कांबळे मुखेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पशुरोग निदान शिबीरात शंभर जनावरांवर मोफत उपचार करण्यात आले.
            तालुक्यातील होडगीड वाडी, दारू तांडा, सोनपेठ वाडी, फतु तांडा येथील पशुपालकांसाठी गोवर्धन गो सेवा केंद्र परिसरात वाढदिवसानिमित्त भव्य पशुरोग निदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. पण काल दि. १५ मार्च रोजी त्यांच्या परिवारातील सदस्य मुखेड न्यायालयातील वकील गोरोबा कांबळे यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळे सकाळच्या सत्रात आयोजित केलेले शिबीर दुपारच्या सत्रात पार पडले व या शिबीरात शंभर हुन जास्त जनावरांवर मोफत उपचार करण्यात आले. परिवारातील सदस्याचे निधन झाल्याने त्यांच्या  अंत्यविधी आटोपुन डाॅ.कांबळे यांनी आयोजित शिबीर संपन्न केल्याने सर्व शेतक-यांनी त्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिले.